चाहती बळी पडली घरगुती हिंसाचाराला; अभिनेता वरुण धवन धावला मदतीला

चाहतीने ट्विटरवरून तिच्यावर होत असलेल्या 'घरगुती हिंसाचाराला आळा घालण्यासाठी मदत मागितली आहे. वरुण धवनला या चाहतीने ट्विटरवर टॅग केल्यापासून चाहत्यांमध्ये तो यावर काय प्रतिक्रिया देतो आहे यावरून कुतूहल निर्माण झालं.
Varun dhawan
Varun dhawan Saam Tv

मुंबई : बॅालिवूड मधील चॅाकलेट बॅाय म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) सध्या त्याच्या 'फॅनस्'मुळे पुन्हा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या गुजरातमधील एका महिला चाहतीने सोशल मिडीयाच्या (Social Media)माध्यमातून मदतीची विनंती केली आहे. ज्यावर प्रतिक्रिया देऊन वरुण धवनने आपल्या अनेक चाहत्यांची मने जिंकली आहेत. वरुण धवनच्या या चाहतीने ट्विटरवरून तिच्यावर होत असलेल्या 'घरगुती हिंसाचाराला (domestic violence) आळा घालण्यासाठी मदत मागितली आहे. वरुण धवनला या चाहतीने ट्विटरवर टॅग केल्यापासून चाहत्यांमध्ये तो यावर काय प्रतिक्रिया देतो आहे यावरून कुतूहल निर्माण झालं. ( Varun dhawan latest news In Marathi )

Varun dhawan
Top 5 Indian Horror Web Series: या 5 वेब सिरीज आणतील अंगावर शहारे!

वरुण धवनला टॅग करून या त्याच्या चाहतीने ट्विट केलं होत की, 'सर माझे वडील मला आणि माझ्या आईला शिव्या देऊन खूप मारतात. मारहाणीचा विरोध केल्यावर आम्हाला मारून टाकण्याची धमकी देतात. त्यांनी आमचं जेवण देखील बंद केलं आहे. आम्ही खूप दिवसांपासून उपाशी आहोत'. पुढे अजून ती असं लिहिते की , 'माझे वडील रोज दारू पिऊन घरी येतात आणि आम्हाला मारतात हा असा सगळा प्रकार आमच्या घरी बऱ्याच वर्षांपासून चालू आहे'.

महिलेने केले तिच्या वडिलांवर गंभीर आरोप...

या महिलेने शेवटी असे लिहिले की, 'माझ्या वडिलांचे एका दुसऱ्या बाई सोबत अनैतिक संबंध आहेत. मी त्यांच्या विरोधात पोलीसात तक्रार देखील नोंदवली होती. यावर कारवाई म्हणून पोलिसांनी तिच्या वडिलांना काही काळ जेलमध्ये देखील ठेवलं होतं पण नंतर त्यांना समज देऊन पाठवण्यात आलं'. असे लिहिताना तिने तिच्यावर झालेल्या अत्याचारांविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

Varun dhawan
तारक मेहता..'मध्ये दयाबेनची होणार पुन्हा एन्ट्री?

वरुण धवनने केले मदतीचे आश्वासन...

महिलेच्या ट्वीटवर प्रत्युतर देताना वरून धवनने रिट्विट करून लिहिले की ,'हे फार गंभीर प्रकरण आहे आणि जर हे खर असेल तर मी नक्कीच तुमची मदत करेन'. याच सोबत वरुण धवनने गुजरात पोलीसला देखील टॅग केले.

दरम्यान, सध्या वरुण धवनचा 'जुग जुग जियो' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून याच्या प्रोमोशनसाठी तो व्यस्त आहे. हा चित्रपट राज मेहताने दिग्दर्शित केला असून हा चित्रपट २४ जून ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये वरुण धवन सोबत कियारा आडवाणी (Kiara Advani),अनिल कपूर (Anil Kapoor) आणि नीतू सिंग (Neetu Singh)देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com