Actress Celebrate Baby Shower: दृश्यम फेम अभिनेत्री आई होणार! कपलचा क्युट व्हिडिओ व्हायरल

Vatsal Sheth-Ishita Dutta: मदर्स डेच्या दिवशी इशिताचे बेबी शॉवर झाले.
Vatsal Sheth-Ishita Dutta Parent To Be
Vatsal Sheth-Ishita Dutta Parent To BeInstagram @ishidutta

Ishita Dutta Celebrate Baby Shower: बॉलिवूड अभिनेत्री इशिता दत्ता लवकरच आई होणार आहे. अलीकडेच इशिता दत्ताने चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली होती. अभिनेत्रीने सोशल मीडियावर बेबी बंपचे फोटो शेअर केले होते. मदर्स डेच्या दिवशी इशिताचे बेबी शॉवर झाले, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

इशिता दत्ता तिच्या प्रेगन्सीचा आनंद घेत आहे आणि तिचा पती वत्सल सेठ देखील तिची काळजी घेताना दिसत आहे. दरम्यान, रविवारी अभिनेत्रीचा बेबी शॉवर झाला. यावेळी अभिनेत्री गुलाबी रंगाच्या साडीत दिसली. त्यावर तिने सोन्याचे दागिने घातले होते आणि भांगात सिंदूर भरला होता. तर दुसरीकडे तिचा नवरा वत्सल पांढरा कुर्ता आणि पायजमामध्ये हँडसम दिसत होता. (Latest Entertainment News)

Vatsal Sheth-Ishita Dutta Parent To Be
Shah Rukh Khan Launches Gauri Khan's Book: मन्नत कसं घडलं? बायको गौरीच्या बुक लाँचच्या वेळी शाहरुखने सांगितला हृदयस्पर्शी किस्सा

या सोहळ्यात इशिता दत्ताची बहीण आणि अभिनेत्री तनुश्री दत्ताही दिसली. तनुश्री बऱ्याच दिवसांनी मीडियासमोर आली आहे. यावेळी ती निळ्या रंगाच्या अनारकली सूटमध्ये दिसली. तनुश्रीशिवाय काजोलही या सोहळ्यात सहभागी झाली होती. यावेळी काजोल लेमन कलरच्या आउटफिटमध्ये दिसली.

यावेळी इशिता दत्ता आणि वत्सल सेठने पापाराझींना अनेक रोमँटिक पोज दिल्या. त्याचे फोटो आणि व्हिडिओ नेटकऱ्यांना खूप आवडले. दोघेही यावेळी खूप आनंदी दिसत होते.

इशिता दत्ता आणि वत्सल सेठच्या यांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात 'रिश्तों का सौदागर-बाजीगर' या टीव्ही शो दरम्यान झाली. दोघांची भेट या सेटवर झाली आणि येथेच इशिता आणि वत्सल एकमेकांच्या जवळ आले.

अभिनेत्याने इशिताला अगदी कॅज्युअल पद्धतीने प्रपोज केले. बोलता बोलता वत्सलने इशिताला विचारले, आता लग्न करूया? आणि या जोडप्याने 28 नोव्हेंबर 2017 रोजी मुंबईतील जुहू येथील इस्कॉन मंदिरात गुपचूप लग्न केले.

इशिता दत्ता 'दृश्यम' आणि 'दृश्यम २'मध्ये दिसली होती. दृश्यमच्या पहिल्या भागाप्रमाणेच दृश्यम २ ला देखील भरपूर यश मिळाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com