विणा जगतापला सोशल मीडियावर अश्लिल भाषेत टिप्पणी; शिव ठाकरेनी घडवली अद्दल

या लोकप्रिय शोच्या माध्यमामधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वीणा जगताप
विणा जगतापला सोशल मीडियावर अश्लिल भाषेत टिप्पणी; शिव ठाकरेनी घडवली अद्दल
विणा जगतापला सोशल मीडियावर अश्लिल भाषेत टिप्पणी; शिव ठाकरेनी घडवली अद्दलSaam Tv

Bigg Boss Marathi : या लोकप्रिय शोच्या माध्यमामधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री Actress वीणा जगताप veena jagtap सोशल मीडियावर social media प्रचंड सक्रिय आहे. आपल्या आयुष्यातील खास क्षण वीणा चाहत्यांबरोबर नेहमीच शेअर करत असतात. चाहतेवर्ग देखील त्यांच्या फोटो Photo आणि व्हिडिओला Video मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत असतात. पण जिथे लोकप्रियता आली, त्याठिकाणी वाईट बोलणारे किंवा ट्रोल करणारे युजर्स देखील येतच असतात.

हे ट्रोलर्स कलाकारांना ट्रोल करण्याची संधी शोधतच असतात. वीणादेखील या ट्रोलर्सना वैतागली आहे. ट्रोलर्सला विणाने चांगलेच झापले आहे. एका युजर्सने विणा जगतापला आक्षेपार्ह अश्लिल शब्दात टिप्पणी करत होता. यामुळे संतापलेल्या विणाने त्या ट्रोलर्सला चांगलीच अद्दल घडवली आहे. अभिनेत्री विणा जगताप हिला युजर्सने अर्वाच्य भाषेत टिप्पणी केली होती. यावर विणा जगताप हिचा संताप अनावर आला.

हे देखील पहा-

इन्स्टाग्रामवर Instagram त्या युजर्सच्या माहितीसहीत पोस्ट Post करत वीणाने चांगलेच सुनावले आहे. तुमच्याकडे काही नैतिकता आहे का? असा सवाल करत हे मी खपवून घेणार नाही. अशा पद्तीचा इशारा विणाने आपल्या इन्स्टा पोस्टद्वारे युजर्सला दिला आहे. त्या युजर्सने मला माझ्या रेट विषयी विचारले, आणि नंतर मेसेज डिलिट केला आहे. यामुळे मी स्क्रीनशॉट Screenshot घेऊ शकले नाही, असे विणाने आपल्या पोस्ट मधून सांगितले आहे.

एखाद्याला ट्रोल करणे अथवा शिविगाळ करणे कायदेशीर नाही. यामुळे एखाद्याला मानसिकरित्या हानी पोहोचेल. अशी ट्रोलिंग व्यक्तीला स्वतःचा जीव घेण्यास प्रोत्साहित करू शकते, असा संताप विणाने आपल्या पोस्ट मधून व्यक्त केला आहे. जे विणाला डीएममध्ये मेसेज करतात. विणा म्हणते, तुम्हाला असे वाटत असणार की, डीएममध्ये मेसेज केला तर कुणाला समजणार नाही, तर अशांना देखील मी सोडणार नाही.

विणा जगतापला सोशल मीडियावर अश्लिल भाषेत टिप्पणी; शिव ठाकरेनी घडवली अद्दल
Marathi #BiggBoss2 | शिव ठाकरे ठरला बिग बॉस पर्व 2चा महाविजेता!

विणाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि टिप्पणी करणाऱ्या चाहत्याला चांगलाच धडा शिकविला आहे. त्या युजर्सचे नाव @satyajit_12333 असे आहे. या प्रकारानंतर त्याने आपले युजर्स आयडी बदलले आहे. विणाला या लढाईत तिचा प्रियकर शिव ठाकरे यानेही मदत केली आहे. शिव ठाकरे याने त्या युजर्सला शोधून काढले आहे. त्याला माफी मागायला भाग पाडले आहे. शिव ठाकरे हा देखील एक इन्स्टा पोस्ट करत इशारा दिला आहे.

मुलीवर काहीही कमेंट करत असाल आणि त्याची कुणीही दखल घेणार नाही हा गैरसमज डोक्यामधून काढून टाका. अवध्या १ तासात सगळी माहिती मिळवली म्हणजे विचार करा. परत असे काही झाल्यास त्याचे परिणाम खूपच वाईट होतील, असा इशारा शिव ठाकरे यांनी दिला आहे. वीणा छोट्या पडद्यावर लोकप्रिय अभिनेत्री असून, राधा प्रेम रंगी रंगली आणि आई माझी काळूबाई, व 'बिग बॉस' यांसारख्या कार्यक्रमात झळकली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com