Chalapathi Rao: तेलुगू अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, वयाच्या ७८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...

तेलुगू चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते चलपती राव यांचे वयाच्या ७८व्या वर्षी निधन झाले आहे.
Chalapati Rao
Chalapati RaoSaam Tv

Chalapathi Rao: तेलुगू चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते चलपती राव यांचे शनिवारी रात्री निधन झाले आहे. चलपती यांनी वयाच्या ७८व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना घरातच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला आहे. या बातमीने पुन्हा एकदा मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

Chalapati Rao
Tunisha Sharma: वाढदिवसाच्या काही दिवस आधीच टूनिशाने मृत्यूला कवटाळले...

चलपती राव यांनी आपल्या मनोरंजन क्षेत्रातील कारकिर्दीत ६०० हून अधिक चित्रपटांत प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा मुलगा रवी बाबू देखील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आहे. राव यांची बऱ्याच दिवसांपासून तब्येत खराब असल्याने अभिनयापासून काही काळ ब्रेक घेतला होता.

Chalapati Rao
Video: रुपालीचे क्रिसमसनिमित्त केले चाहत्यांचे मनोरंजन, हूक स्टेप्सने सर्वांचेच लक्ष वेधले...

चलपती राव यांच्या निधनाने परिवारासह, चाहते, मित्रपरिवार आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. ते आपल्या वाढत्या वयाबरोबर अभिनयापासून दूर होत गेले. मात्र आपल्या अभिनयाच्या जोरावर तो चाहत्यांच्या मनावर राज्य करत असे. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहते आणि अभिनेते सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com