Vicky Kaushal: विकी कौशलने वडिलांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, फोटो शेअर करत केली भावनिक पोस्ट

विकी कौशलने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Vicky Kaushal Birth wishes for his Dad
Vicky Kaushal Birth wishes for his DadSaam tv

Vicky Kaushal Instagram Story: बॉलिवूड अभिनेता विकी कौशल त्याच्या वडिलांच्या खूप जवळ आहे. विक्की त्याच्या वडिलांबद्दलच्या भावना नेहमीच उघडपणे मांडत असतो. विकीने पुन्हा एकदा त्यांच्या वडिलांविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. आज विकीचे वडील श्याम कौशल त्याचा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने विकी कौशलने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विकीने शेअर केलेल्या या फोटोला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे.

Vicky Kaushal Birth wishes for his Dad
Kangana Ranaut: श्रद्धाचे शेवटचे पत्र वाचून कंगना भावूक, व्यक्त केल्या आपल्या भावना

विकीने त्याच्या वडिलांसोबतच्या एका कार्यक्रमातील फोटो शेअर केला आहे. फोटोत त्याची आई सुद्धा दिसत आहे. फोटो शेअर करताना विकीने एक भावनिक पोस्टही लिहिली आहे. अभिनेत्याने त्याच्या वडिलांसाठी लिहिले, 'माझा आधारस्तंभ... वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!!! तुला एक मोठी घट्ट मिठी.'

विकी कौशलचे त्याच्या कुटुंबासोबत खूप चांगले बॉन्डिंग आहे. तो त्याच्या कुटुंबाशी खूप भावनिकरित्या जोडलेला आहे. विकीचे वडील श्याम कौशल हे बॉलिवूडचे प्रसिद्ध अॅक्शन डायरेक्टर आहेत. अजय देवगण, हृतिक रोशन यांसारख्या बड्या स्टार्ससोबत त्यांनी अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम केले आहे. विकीचा धाकटा भाऊही अभिनय क्षेत्रात आहे. मात्र, यशानंतरही कौशल कुटुंब प्रसिद्धीपासून दूरच आहे. (Vicky Kaushal)

Vicky Kaushal wishes his Dad on Instagram
Vicky Kaushal wishes his Dad on Instagram Saam Tv

विकी कौशलच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, विकीचा 'गोविंदा मेरा नाम' हा चित्रपट 16 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकरही दिसणार आहेत. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय विकी लवकरच 'सॅम बहादूर' नावाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. चित्रपट हा दिवंगत फील्ड मार्शल सॅम मानेक शॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. (OTT)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com