Vicky Kaushal - Sara Ali Khan Video : विकी कौशल - सारा अली खान चाहत्यांना दिलं सरप्राईज ; हटके स्टाईलने जिंकली अनेकांची मनं

Vicky Kaushal - Sara Ali Khan: विकी - साराने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक नवनवीन युक्त्या केल्या.
Vicky Kaushal - Sara Ali Khan Video
Vicky Kaushal - Sara Ali Khan VideoSaam TV

Vicky Kaushal - Sara Ali Khan Surprises Fans: विकी - साराचा 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट २ जूनला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षक जबरदस्त प्रतिसाद देत आहेत. विकी - साराने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक नवनवीन युक्त्या केल्या.

कधी स्ट्रीट शॉपिंग केली तर कधी तिथल्या लोकल लोकांमध्ये वावरले, संवाद साधला. दोघांनी अनेक शहरांना भेटी दिल्या. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान या दोघांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. प्रमोशन दरम्यान या दोघांनी अनेक मंदिरांना भेटी दिल्या. (Latest Entertainment News)

Vicky Kaushal - Sara Ali Khan Video
Katrina Kaif Impress Vicky Kaushal कतरिनाने विकीला इम्प्रेस करण्यासाठी गायलं पंजाबी गाणं; गाणे ऐकताच अभिनेत्याने डोक्यालाच हात लावला

दोघेही सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अनेक बॉलिवूड कलाकारांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. या दोघांचा हा एकत्र पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाने आतापर्यंत ४५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बराच खर्च करण्यात आला आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे.

विकी-साराने थेट थिए़टरमध्ये जाऊन चाहत्यांना दिलं सरप्राइज

विकी-साराने जसे प्रमोशनसाठी अनेक शहरांना भेट दिली. तसेच आता चित्रपट रिलीज झाल्यावर ते दोघे थिएटर्संना भेट देत आहे. साराने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात ते दोघं मालाड वेस्ट येथील इनऑरबिट मॉल व फन रिपब्लीक, अंधेरी येथे भेट द्यायला गेले आहेत. हे दोन्ही शो हाउसफुल होते. विकी-सारा येताच प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत, ओरडून त्यांच स्वागत केलं.

व्हिडिओमध्ये विकी- साराने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांना चित्रपट कसा वाटला हे विचारलं. प्रेक्षक आणि त्यांच्या फॅन्सनी त्यांना चित्रपट खूप आवडल्याच सांगितल. अनेकांनी साराच्या आणि विकीच्या कामाचं कौतुक केलं आहे.

हा व्हिडिओ शेअर करत साराने व्हिडिओला हाउसफुल, दिल फुल असं कॅप्शन देखील दिलं आहे. साराच्या या पोस्टवर प्रेक्षकांनी लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com