न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकला 'बेबोचा' व्हिडिओ

करीना कपूर खानने तिच्या कारकीर्दीत अनेक उत्तम चित्रपट व पात्र साकारले आहेत. करीना बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे. अलीकडेच तिने स्वत:चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला त्यात करीना खूप उत्साही दिसत होती.
न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकला 'बेबोचा' व्हिडिओ
करीना कपूर Twitter/ @KareenaK_FC

करीना कपूर खानने (Kareena Kapoor) तिच्या कारकीर्दीत अनेक उत्तम चित्रपट व पात्र साकारले आहेत. करीना बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे. अलीकडेच तिने स्वत:चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला त्यात करीना खूप उत्साही दिसत होती. हा व्हिडिओ अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील आयकॉनिक टाइम्स स्क्वेअरचा (Iconic Times Square) आहे. ज्यात करीना कपूर खान एका मोठ्या बिलबोर्डवर झळकताना दिसत आहे. तथापि, तो व्हिडिओ बेबोने केलेल्या ज्वेलरी ब्रँडचा आहे.

या व्हिडिओसह, करीनाने लिहिले आहे - एका बिलबोर्डवर हिरा आणि सोन्यासारखं चमकताना. यासह तिने टाइम्स स्क्वेअर एनवायसी हॅशटॅग लिहिले आहे. करीनाच्या या व्हिडिओवर बर्‍याच प्रतिक्रिया येत आहेत. तिची मेव्हणी आणि सैफ अली खानची धाकटी बहीण सबा अली खान यांनी लिहिले आहे - तू नेहमी प्रमाणे झळकत आहेस. प्रियंका चोप्रा जोनासने देखील त्यावर प्रतिक्रीया दिली आहे. (A video of Kareena Kapoor has been played in New York's Times Square)

करीना आणि प्रियंकाने ऐताराजमध्ये एकत्र काम केले होते. यामध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar) मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात प्रियांकाने निगेटिव्ह रोल केला होता. नंतर प्रियांका चोप्राने शाहरुख खानच्या ‘डॉन’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. त्याचवेळी करीनाने एक खास गाणे केले होते. करीनाच्या कारकीर्दीबद्दल बोलताना ती आता आमिर खान (Amir Khan) सोबत लालसिंग चड्ढामध्ये दिसणार आहे. करीनाने हॉलिवूड फिल्म फॉरेस्ट गंपच्या या रिमेकचे शूटिंग पूर्ण केले आहे.

करीना कपूर
WTC Finals: सचिनने रवी शास्त्रींचे केले जोरदार कौतुक

अलीकडे आलेल्या बातम्यांमध्ये करीना बरिच ट्रोल झाली होती. बातमीनुसार करिनाला रामायणवरील एका चित्रपटात सीतेच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली आहे. यामुळे सोशल मीडियावर तिच्या बहिष्काराची मागणी सुरू झाली आहे. यावर्षी करिना दुसऱ्यांदा आई बनली आहे. लालसिंग चड्ढा नंतर करिनाच्या चित्रपटाची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com