विद्या बालनने इन्स्टाग्रामवर शेअर केला 'हा' धमाल व्हिडिओ; एकदा पाहाच, पोट धरून नक्की हसाल

एक विनोदी रील विद्या बालनने इंस्टाग्राम अकाउंटवर शेयर केला आहे.सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होतच असतं.नवनवीन गोष्टी ट्रेंडवर येत असतात.या ट्रेंडला कलाकारही फॉलो करून कॉपी करत असतात. विद्या बालनने देखील अशाच एका व्हायरल गाण्यावरील रील तयार करून इंस्टाग्राम अकाउंटवर शेयर केला आहे.
विद्या बालनने इन्स्टाग्रामवर शेअर केला 'हा' धमाल व्हिडिओ; एकदा पाहाच, पोट धरून नक्की हसाल
vidya balan instagramSaam Tv

मुंबई : ज्या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये (bollywood) हटके अंदाजात काम करुन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तसंच आपल्या चित्रपटांमधून आगळ्या वेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षाकांचं मनोरंजन करण्यात अग्रेसर असणारी अभिनेत्री म्हणजे (Vidya Balan) विद्या बालन. 'कहाणी' या चित्रपटामध्ये तिचा धीर-गंभीर अभिनय असो वा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली एखादी रील असो, विद्या बालन नेहमीच अष्टपैलू अभिनयामुळं सिनेविश्वात चर्चेत असते. विनोद करुन प्रेक्षकांचा भरभरुन मनोरंजन करणं विद्याला खूपच आवडतं. त्यामुळे आताही तिनं असाच एक विनोदी रील तिच्या इंस्टाग्राम (instagram) अकाउंटवर शेयर केला आहे.सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होतच असतं.नवनवीन गोष्टी ट्रेंडवर येत असतात.या ट्रेंडला कलाकारही फॉलो करून कॉपी करत असतात. विद्या बालनने देखील अशाच एका व्हायरल गाण्यावरील रील तयार करून इंस्टाग्राम अकाउंटवर शेयर केला आहे.

vidya balan instagram
ऐश्वर्याने व्यक्त केली इच्छा; पुन्हा अभिषेकसोबत...

विद्या बालनचा मजेदार रील व्हिडीओ...

विद्या बालनने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये तिने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप घातला आहे व सोबत निळा आणि पांढऱ्या चेक्सचा शर्ट घातला आहे.निळ्या रंगाची डेनिम जिन्समध्ये कॅज्युअल लुक केला आहे. या व्हिडिओत विद्या बालन बियॉन्सेच्या पार्टीशन या गाण्यावर अभिनय करताना दिसत आहे. गाणं सुरु असताना विद्या हळूहळू खाली बसण्याचा प्रयत्न करते,पण मध्येच हाड तुटल्याचा आवाज येतो. त्यानंतर विद्याने दिलेली झळक पाहून तुम्हीही पोट धरुन हसल्याशिवाय राहणार नाहीत. 'प्रत्येक ट्रेंड तुमच्यासाठी नसतो'असं विद्याने कॅप्शनमध्ये लिहून व्हिडिओ शेअर केला आहे.

विद्याच्या रीलवर सेलिब्रिटीही भरभरून हसले

विद्या बालनचा हा धमाल रील पाहून तिच्या चाहत्यांचं मनोरंजन तर होतंच आहे. पण सेलिब्रिटीजही या रीलचा मनसोक्त आनंद घेत आहेत. तसंच या रीलबाबत इलियाना डिक्रूझने लिहिलं,'तुम्ही मजेशीर आहात.परंतु, आम्हा सर्वांना माहित आहे की, तुम्ही कोणत्याही ट्रेंडला पूर्णपणे नष्ट करू शकता'त्याचवेळी, दिया मिर्झाने देखील हृदय आणि हसणारा इमोजी कमेंट केला आहे. विद्या बालनचा काही महिन्यांपूर्वीच 'जलसा'हा चित्रपट प्रदर्शित झाला होता .तसेच विद्या बालनचा आगामी चित्रपट 'नियत' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय अभिनेत्री विद्या बालन एका नवीन प्रोजेक्टवरही काम करत आहे.

Edited By - Shruti Kadam

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com