South Superstar Simplicity: सुपरस्टारचा साधेपणा पाहिलात का? चित्रपटाने ७०० कोटींचं कलेक्शन केलं अन् अभिनेता चप्पल घालून सेलिब्रेशनला आला

Jawan Success Party: विजय सेतुपतीच्या साधेपणाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
Jawan Team
Jawan Team Saam TV

Vijay Sethupathi At Jawan Success Party:

'जवान' चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटाने ७०० कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. नुकतीच 'जवान'च्या टीमने सक्सेस पार्टी साजरी केली आहे. या पार्टीमध्ये सगळ्यात जास्त चर्चा झाली ती चित्रपटाचा व्हिलन म्हणजे विजय सेतुपतीची.

दाक्षिणात्य अभिनेते अभिनयासह त्यांच्या स्टाईलसाठी देखील ओळखले जातात. दाक्षिणात्य चित्रपट जितके भव्य असतात तितकाच साधेपणा त्या कलाकारांमध्ये पाहायला मिळतो.

Jawan Team
Marathi Serial Goes Off Air: अंतरा - मल्हारचा प्रेक्षकांचा अलविदा; 'जीव माझा गुंतला' मालिकेचा प्रवास संपला

अभिनेता विजय सेतुपतीची दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत खुप क्रेझ आहे. त्याची फॅन फॉलेविंग देखील दमदार आहे. काल झालेल्या इव्हेंटमध्ये विजय सेतुपतीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

काल मुंबईमध्ये जवानच्या सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये शाहरूख खान, दीपिका पदुकोण, विजय सेतुपती, अॅटली कुमार तसेच जवानची टीम उपस्थित होती. 'जवान'चे सर्व कलाकार त्यांच्या बेस्ट लूकमध्ये पार्टीला आले होते.

शाहरूख खान देखील महागड्या सुटाबुटात होता. तसेच त्याने हेअर स्टाईल देखील केली होती. परंतु साऊथच्या सुपरस्टारने त्याच्या साधेपणा सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

या सक्सेस पार्टीमध्ये जवानमधील काली म्हणजे विजय सेतुपती उभ्या रेषा असलेला निळा शर्ट आणि खाकी पॅन्ट घालून आला होता. तसेच त्याच्या पायात बुटांऐवजी हिरव्या रंगाची चप्पल होती. फोटो काढण्यासाठी तो अगदी शेवटी उभा होता. काही घाईगडबड नाही. सुपरस्टार असल्याचा चेहऱ्यावर अभिमान नाही. त्याच्या या साधेपणाने सगळे चकित झाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com