Vikram Gokhale: अभिनयाच्या महानायकाचा मित्र काळाच्या पडद्याआड; वाईट काळात केली होती बिग बींनी मोठी मदत

विक्रम गोखले अग्निपथ, दिल से, भूल भुलैया, दे दना दान, लाइफ पार्टनर, हिचकी, मिशन मंगल आणि निकम या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत होते.
Vikram Gokhale And Amitabh Bachchan
Vikram Gokhale And Amitabh BachchanSaam Tv

Vikram Gokhale: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज वयाच्या ७७ वर्षी निधन झाले आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी आज (शनिवारी) अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्यावर गेल्या १५ दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. गोखले यांच्या पश्चात पत्नी वृषाली गोखले आणि त्यांच्या दोन मुली असा परिवार आहे.

Vikram Gokhale And Amitabh Bachchan
Vikram Gokhale : रंगभूमीवरचा 'बॅरिस्टर' हरपला; ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन

विक्रम गोखलेंनी अनेक चित्रपटांत आपली मुख्य भूमिका साकारली आहे. टीव्ही मालिकेंमध्ये, मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांत अनेक भूमिका गाजवले आहे. अभिनेते म्हणून त्यांची एक वेगळीच ओळख होती. सिनेमांमध्ये मिळेल त्या भूमिकेला योग्य न्याय त्यांनी आजवर दिला. त्यांचा मोठा चाहता वर्गदेखील होता. मात्र घशाच्या त्रासामुळे त्यांनी अभिनयापासून संन्यास घेतला आहे.

Vikram Gokhale And Amitabh Bachchan
Vikram Gokhale: विक्रम गोखलेंनी अनुपम खेर यांना दोन आठवड्यांपूर्वी पाठवला होता मेसेज, "मित्रा जीवन अपूर्ण आहे..." पाहा VIDEO

१९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साळींच्या हम दिल दे चुके सनममध्ये विक्रम गोखले यांनी ऐश्वर्या राय बच्चनच्या वडिलांची भूमिका साकारली होती. याशिवाय विक्रम गोखले अग्निपथ, दिल से, भूल भुलैया, दे दना दान, लाइफ पार्टनर, हिचकी, मिशन मंगल आणि निकम या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत होते.

Vikram Gokhale And Amitabh Bachchan
Vikram Gokhale: माझ्या आयुष्यात पाहिलेलं पहिलं नाटक विक्रम गोखलेंचं होतं; सुबोध भावेने दिला आठवणींना उजाळा

अमिताभ बच्चन यांची वाईट काळात विक्रम गोखलेंना मदत

विक्रम गोखले यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'अग्निपथ' या चित्रपटात काम केले होते. विक्रम गोखले यांनी त्यांच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल आणि अमिताभ बच्चन यांच्याबद्दल एका इंग्लिश संकेतस्थळाला माहिती देत म्हणाले होते, 'जेव्हा मी या उद्योगात प्रवेश केला तेव्हा मला खूप संघर्ष करावा लागला.

मी आर्थिक संकटातून जात होतो आणि मुंबईत घर शोधत होतो. हे अमिताभ बच्चन यांना कळताच त्यांनी स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना पत्र लिहिलं. त्यांच्या शिफारशीवरून मला सरकारकडून घर मिळालं. मी तयार केलेले ते पत्र अजूनही माझ्याकडे आहे.

Vikram Gokhale And Amitabh Bachchan
Vikram Gokhale : रंगभूमीवरील 'बॅरिस्टर'; विक्रम गोखलेंचा जीवनप्रवास

विक्रम गोखले यांचे संपूर्ण कुटुंब मनोरंजन क्षेत्रात

विक्रम गोखले हे टीव्ही मालिकेंमध्ये, मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांत सक्रिय होते. गोखले हे मराठी रंगभूमी आणि चित्रपट अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे पुत्र आहेत. इतकेच नाही तर विक्रम गोखलेंची पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय पडद्यावरच्या पहिल्या महिला अभिनेत्री असल्याचं म्हटलं जातं. विक्रम गोखले यांची आजी कमलाबाई गोखले यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली महिला बालकलाकार म्हणून काम केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com