'अमेरिकेने व्हिसा नाकारलेल्या व्यक्तीचा पहिल्या 10 मध्ये सन्मान होतोय हे काहींना पाहवत नाही'

'ज्याला अमेरिकेने व्हिसा नाकारलेला आज त्या व्यक्तीचा पहिल्या 10 मध्ये सन्मान होत असल्याने हे काही लोकांना पाहवत नाही.' कोणीतरी माणूस देशाकरता काही करतो हे म्हटल्यावर तो लोकप्रिय होणार.
'अमेरिकेने व्हिसा नाकारलेल्या व्यक्तीचा पहिल्या 10 मध्ये सन्मान होतोय हे काहींना पाहवत नाही'
Narendra ModiSaamTV

मुंबई : विक्रम गोखलेंनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा कंगानाच (Kangana) समर्थन करतच आपला देश सर्व सामान्यांकरिता 2014 पासून खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला या त्यांच्या वक्तव्यावरती ते ठाम राहिले शिवाय त्यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) सत्तेवरती आल्यापासून देश सुरक्षित झाला असल्याचं वक्तव्यं देखील केलं.

हे देखील पहा -

भाजप शिवसेनेने एकत्र यायला पाहिजे -

ते म्हणाले '1962 चा भारत 2021 मध्ये राहिला नाही; हे जगाला आणि शत्रूला कळत तेव्हा शत्रू विचार करतात काय करावं लागेल मात्र आपल्या राजकीय पक्षाचे लोक यांच्याशी संबंधीत असतात तेव्हा संताप होतो. तसेच भाजप शिवसेनेने (BJP Shivsena) एकत्र यायला पाहिजे. समविचारी पक्षाने एकत्र यायला हवं असं मतं विक्रम गोखलेंनी आज व्यक्तं केलं तसेच राजकारणार काय होईल कोण कशा पगड्या फिरवेल्या मतपेटीचे राजकारण करून काय करील याचा नेम नाही. तसेच ज्यांना माझं मत समजतं अश्या तरुणांनी पुढे यावं असं आवाहन देखील गोखलेंनी यावेळी केलं.

Narendra Modi
'मी माझ्या बापाचं नाव लावतो.. शाहरुख काय संपुर्ण बॉलिवूड माझं काही बिघडवू शकत नाही'

इस्राईल ला 100 टक्के मार्क -

'ज्याला अमेरिकेने व्हिसा (US Visa) नाकारलेला आज त्या व्यक्तीचा पहिल्या 10 मध्ये सन्मान होत असल्याने हे काही लोकांना पाहवत नाही.' तसेच कोणीतरी वेगळा माणूस देशाकरता काही करतो हे म्हटल्यावर तो लोकप्रिय होणार. त्या भीतीने बाकीचे भुकायला सुरुवात करतात. सत्तेत कोणीही असो आपला देश बळकट असला पाहिजे. त्याकरिता मी इस्राईल (Israel) ला 100 टक्के मार्क असं देखील ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com