
Anurag Kashyap Wanted Chiyaan Vikram In Kennedy: फिल्मेकर अनुराग कश्यप आणि साऊथ स्टार चियान विक्रम यांच्या सध्या ट्विटरवर शाब्दिक युद्ध सुरू आहे. काही दिवसांपूर्वी अनुराग यांनी सांगितलं होत की, केनेडी या चित्रपटासाठी त्यांना चियान विक्रमला कास्ट करायचे होते. परंतु विक्रमने, अनुरागच्या ईमेल रिप्लाय दिला नाही, तर विक्रमने त्याला कोणताही ईमेल आला नसल्याचे सांगितले आहे. त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी अनुराग यांनी लांबलचक ट्विट केले आहे.
अनुराग यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे, अगदी बरोबर बॉस सर. लोकांच्या माहितीसाठी, जेव्हा त्याला दुसर्या अभिनेत्याकडून समजले की मी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे तेव्हा त्याने मला लगेच कॉल केला. (Latest Entertainment News)
तेव्हा आम्हाला समजले की त्याचा व्हॉट्सअॅप नंबर वेगळा आहे. त्याने मला त्याची योग्य माहिती दिली आणि स्क्रिप्ट वाचण्यात रसही दाखवला पण तोपर्यंत आम्ही सगळं लॉक केलं होतं आणि शूटिंग सुरू करण्यासाठी एक महिनाच उरला होता.
चित्रपटासाठी “केनेडी” हे नाव वापरण्यासाठी त्यांनी त्याने शुभेच्छा देखील दिल्या. मी मुलाखतीत सांगितले की चित्रपटाला केनेडी नाव असे पडले हे त्यामागील कथा सांगितली. कोणत्याही ओव्हर रिअक्शनची गरज नाही आणि निश्चितपणे मला वाटते की चियान सर किंवा मी दोघेही एकत्र काम केल्याशिवाय निवृत्त होत नाही. FYI आम्ही सेथुपूर्व दिवसांकडे परत जातो.
याआधी, विक्रमने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले होते, "प्रिय अनुराग, सोशल मीडियावरील मित्र आणि हितचिंतकांसाठी, माझे आणि तुमचे एक वर्ष जुने संभाषण शेअर करत आहे. मी एका अभिनेत्याकडून ऐकले आहे की तुम्ही एका चित्रपटासाठी माझ्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करत होतात, तुला वाटलं मी प्रतिसाद देत नाहीये. पण मला कळताच मी लगेच तुला फोन केला.
पण तू ज्या ई-मेल आयडीवर माझ्याशी संपर्क साधला होतास तो आता सक्रिय नाही आणि माझा फोन नंबरही दोन वर्षांपूर्वीचा होता. आता तो बदलला आहे."
सनी लिओन आणि राहुल भट्ट स्टारर चित्रपट 'केनेडी' 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023' च्या मिडनाईट स्क्रीनिंग सेक्शन अंतर्गत प्रदर्शित केला जाईल. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अनुराग कश्यपने सांगितले की, त्याला राहुल भट्टच्या जागी विक्रमला चित्रपटात कास्ट कार्याचे होते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.