Salman-Akshay Dance Video: सलमानसोबत डान्स केल्याने अक्षय कुमार ट्रोल; नेटकऱ्यांनी घेतली 'खिलाडी'ची फिरकी

'मैं खिलाड़ी तू अनाड़ी'वर थिरकले भाईजान आणि खिलाडी.
Salman Khan and Akshay Kumar Dance Video
Salman Khan and Akshay Kumar Dance VideoSaam TV

Viral Dance Video Of Salman Khan and Akshay Kumar: बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 'सेल्फी' या चित्रपटाचे फारच वेगळे प्रमोशन अक्षय करत आहे. या चित्रपटातील 'मैं खिलाड़ी तू अनाड़ी' या गाण्याचे रिमेक व्हर्जन प्रदर्शित झाले आहे. हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अक्षय कुमारने टायगर श्रॉफसोबत या गाण्यावर डान्स केला होता. तसेच त्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत सगळ्यांना या गाण्यावर डान्स करून व्हिडिओ शेअर करण्याचे चॅलेंज दिले आहे. अक्षयने बॉलीवूडमधील अनेक कलाकारांसोबत डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. तर अक्षयच्या नुकत्याच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तो सलमान खानसोबत डान्स करत आहे.

Salman Khan and Akshay Kumar Dance Video
Pathan 11th Day Collection: 'पठान' ठरला भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट, आमिरच्या सात वर्षांपूर्वीच्या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला

अक्षय कुमार त्याचा आगामी चित्रपट आणि त्यातील हे गाणे प्रमोट करत आहे. 'मैं खिलाड़ी तू अनाड़ी' या गाण्यावर पहिल्यांदा अक्षयने टायगरसोबत डान्स केला. त्यांच्या याच डान्सचा व्हिडिओ अक्षय कुमार सलमान खानला दाखवताना व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर अक्षय कुमार डान्स सुरूवात करता आणि सलमान त्याला साथ देतो.

सलमान काही सेकंदातच अक्षय कुमारच्या डान्स स्टेप मॅच करतो. दोघांचाही धमाल डान्स या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. सलमान आणि अक्षयने हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावर नेटकरी कमेंट करून प्रतिक्रिया देत आहेत.

काही नेटकरी दोघांच्या डान्सचे कौतुक करत आहेत, तर काहीजण 'मुझसे शादी करोगी'च्या दुसऱ्या भाग यावा अशी मागणी करत आहेत. एका नेटकऱ्यांने लिहिले आहे, 'भाईचा डान्स पाहून मजा आली, डान्स केला पण त्याचा स्वॅग कमाल आहे', तर दुसऱ्याने लिहिले, 'या दोघांना पुन्हा एकत्र पाहण्याची इच्छा आहे.'

तसेच काही नेटकरी अक्षयला ट्रोल देखील करत आहेत. एकाने लिहिले, 'पठाननंतर आता खिलाडीही भाई..टायगरची मदत घ्यायला आला आहे, तर दुसऱ्याने लिहिले की, 'बॉलीवूड अभिनेत्यांना फक्त सलमान खानच वाचवू शकतो.

'सेल्फी' 24 फेब्रुवारीला चित्रपगृहांमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त इमरान हाश्मी, डायना पेंटी आणि नुसरत भरुचा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याचबरोबर 'सेल्फी' नंतर अक्षय 'ओह माय गॉड 2', 'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि 'कॅप्सूल गिल'मध्ये दिसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com