Vivek Agnihotri-Anurag Kashyap: विवेक अग्निहोत्री - अनुराग कश्यपमध्ये जुंपली, 'कांतारा' चित्रपटामुळे रंगला दोघांमध्ये ट्विटरवॉर

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने 'कांतारा' आणि 'पुष्पा' सारखे चित्रपट सिनेसृष्टीला उध्वस्त करत असल्याची टीका केली
Vivek Agnihotri And Anurag Kashyap
Vivek Agnihotri And Anurag KashyapSaam Tv

Vivek Agnihotri -Anurag Kashyap Controversy: बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्रिहोत्री आपल्या चित्रपटांपेक्षा वादग्रस्त वक्तव्यांमुळेच जास्त चर्चेत असतात. सोशल मीडियावर नेहमीच ते विविध विषयांवर आपले मत व्यक्त करत असतात. ज्यामुळे अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. सध्या त्यांच्या अशाच एका ट्विटची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे ज्यामधून त्यांनी अनुराग कश्यप यांच्यावर निशाणा साधला आहे. मात्र अनुराग कश्यपनेही त्यांडा सडेतोड उत्तर दिले आहे ज्याची चर्चा मीडिया जगतात रंगली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेवू.

Vivek Agnihotri And Anurag Kashyap
Harish Dudhade: 'पावनखिंड' फेम अभिनेत्याची नवी इनिंग सुरू, हरिश दुधाडे अडकला लग्नबंधनात

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने 'कांतारा' आणि 'पुष्पा' सारखे चित्रपट सिनेसृष्टीला उध्वस्त करत असल्याची टीका केली होती. अनुराग कश्यपच्या याच बातमीचा संदर्भ घेत विवेक अग्रिहोत्रींनी ट्विटरवरुन त्यांच्यावर निशाणा साधला होता. ज्यामध्ये त्यांनी या बातमीचा स्क्रिनशॉट शेअर करत "बॉलिवूडच्या या एकमेव मीलॉर्डच्या वक्तव्याशी मी पुर्णपणे असहमत आहे, तुम्ही सहमत आहात का?" असा सवाल केला होता. त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. (Bollywood)

मात्र विवेक अग्निहोत्री यांच्या या ट्विटनंतर अनुराग कश्यपनेही त्यांना सडेतोड उत्तर देत "सर ही तुमची चूक नाही. तुमचे चित्रपटाचे संशोधन ही असेच असते जसे तुम्ही माझ्या संवादावर ट्विट केले आहे. तुमचे आणि तुमच्या माध्यमाचेही असेच हाल आहेत. तरीही पुढच्या वेळी जरा गांभीर्याने संशोधन करा," असा सल्लाच दिला आहे. दोघांमधील हे ट्विटरवॉर सध्या चांगलेच चर्चेत आहे. दरम्यान विवेक अग्रिहोत्री यांनी दिग्दर्शित केलेला द काश्मिर फाईल्स चित्रपट चांगलाच गाजला होता. चित्रपटात अनुपम खेर , मिथुन चक्रवर्ती यांनी मुख्य भूमिका साकारली होती. (Movie)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com