
Gyaarah Gyaarah Teaser Release: करण जोहर नेहमीच आपल्या चित्रपटांमुळे बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. त्याने आता पर्यंत अनेक चित्रपट दिले आहेत. नुकतंच त्याने त्याच्या नव्या वेबसीरिजची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या तो चर्चेत आला आहे. निर्माता करण जोहरने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘ग्यारह ग्यारह’ या वेबसीरिजचा टीझर शेअर केला आहे. सस्पेन्स आणि थ्रिलर असलेल्या या वेबसीरिजचा टीझर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ऑस्कर विनर गुनीत मोंगा सोबत एकत्र येत त्याने या वेबसीरिजची निर्मिती केली.
‘ग्यारह ग्यारह’ ही वेबसीरिज एक इन्वेस्टिगेटिव्ह फँटसी सीरिज असून लवकरच झी ५ (ZEE5) वर वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत धैर्य करवा, राघव जुयाल आणि कृतिका कामरा हे कलाकार आहेत. या सीरिजमध्ये प्रेक्षकांना १९९०, २००१ आणि २०१६ मधील तीन वेगवेगळ्या कथा दाखवण्यात आल्या आहेत. (Bollywood)
गुनीत मोंगाचे शिखरा एंटरटेनमेंट प्रोडक्शन हाऊस आणि करण जोहरचे ओटीटी प्रोडक्शन हाऊस धर्मा एंटरटेनमेंट यांनी एकत्र येत ‘ग्यारह ग्यारह’ बनवण्याची जबाबदारी घेतली आहे. या दोघांनीही पहिल्यांदाच या वेबसीरिजसाठी एकत्र काम केले आहे. (Bollywood Film)
‘ग्यारह ग्यारह’चे दिग्दर्शन उमेश बिश्ट करत आहेत. त्याचबरोबर या सीरीजमध्ये कथा पूजा बॅनर्जी आणि संजय शेखर यांनी एकत्र येत लिहिली आहे. या वर्षाच्या ऑस्कर विजेत्या सेलिब्रिटींच्या यादीत गुनीत मोंगा यांचा समावेश आहे. मोंगाची डॉक्युमेंट्री ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ने ‘बेस्ट डाक्युमेंट्री शॉर्ट फिल्म’ श्रेणीत ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.
‘ग्यारह ग्यारह’मध्ये राघव जुयालने आतापर्यंत साकारलेल्या पात्रांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या रुपात दिसत आहे. अभिनेत्याने सर्वप्रथम टेलिव्हिजनसृष्टीतून आपल्या करिअरची सुरुवात केली. राघव जुयाल डान्स रिॲलिटी शोमधून प्रसिद्धीझोतात आला. यानंतर त्याने स्वतः अनेक डान्सिंग शो होस्ट केले असून राघव शेवटचा सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दिसला होता.
‘किसी का भाई किसी की जान’मध्ये राघव जुयाल एका वेगळ्याच भूमिकेत दिसला होता, पण ‘ग्यारह ग्यारह’मध्ये तो एका गंभीर भूमिकेत दिसत आहे. टीझरमध्ये अभिनेत्याची एक छोटीशी झलक दिसली, ज्यामध्ये तो गंभीर भूमिकेत दिसत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.