Welcome 3 Teaser Cost: ‘वेलकम ३’च्या टीझरवर मेकर्सने केला पाण्यासारखा पैसा खर्च, आकडा पाहून तुम्हालाही बसेल दातखिळी

Welcome 3 Teaser: ‘वेलकम ३’चा टीझर बनवण्यासाठी निर्मात्यांनी करोडो रुपये खर्च केले आहेत.
Welcome 3 Teaser Cost
Welcome 3 Teaser CostSaam Tv

Welcome 3 Teaser Cost

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारच्या वाढदिवशी त्याने त्याच्या आगामी चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. अभिनेत्याच्या वाढदिवशी सोशल मीडियावर ‘वेलकम ३’चा टीझर आऊट झाला होता. (Welcome 3 Teaser)

या मल्टीस्टारर चित्रपटामध्ये, अक्षय कुमारसोबत परेश रावल, संजय दत्त, सुनील शेट्टी, अर्शद वारसी, जॉनी लीव्हर, राजपाल यादव, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कृष्णा अभिषेक, किकू शारदा, दलेर मेहंदी, मिका सिंग, राहुल देव, मुकेश तिवारी, शारीब हाश्मी., झाकीर हुसैन, यशपाल शर्मा, रवीना टंडन, लारा दत्ता, जॅकलिन फर्नांडिस, दिशा पटानी आणि वृही कोडवारा अशी दमदार स्टारकास्ट प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचा टीझर बनवण्यासाठी निर्मात्यांनी करोडो रुपये खर्च केले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, ३ मिनिट २० सेकंदाचा व्हिडिओ बनवण्यासाठी निर्मात्यांनी कोट्यवधींचा खर्च केला आहे.

Welcome 3 Teaser Cost
Manik Bhide Passed Away: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे यांचं निधन

मिड-डेच्या अहवालानुसार, निर्माते फिरोज नाडियादवाला यांनी ‘वेलकम ३’च्या टीझरवर २ कोटी रुपये खर्च केले आहेत. शेअर केलेल्या टीझर व्हिडिओमध्ये, २४ कलाकार परफॉर्म करताना दिसत आहेत. रिपोर्टनुसार, टीझर व्हिडिओला पूर्णपणे तयार करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी लागला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘वेलकम ३’ मध्ये नाना पाटेकर आणि अनिल कपूर दिसणार नाहीत. नाना पाटेकरांनी चित्रपटाविषयी प्रतिक्रिया दिली की, मी या चित्रपटाचा भाग नाही, कदाचित माझं वय झाल्यामुळे त्यांनी मला घेतलं नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. नाना पाटेकर राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या 'द वॅक्सीन वॉर' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पुनरागमन करणार आहे.

चित्रपट २०२४ च्या वर्षअखेरीस प्रदर्शित होणार असून प्रेक्षक ‘वेलकम ३’बद्दल खूपच उत्सुक आहेत. चित्रपटाची थीम जंगलची असून टीझरमध्ये सगळ्याच कलाकारांनी हातात हत्यार घेऊन उभे असल्याचे दिसून येत आहे. अक्षय कुमार, कतरिना कैफ, परेश रावल, नाना पाटेकर, अनिल कपूर यांचा ‘वेलकम’ २००७ साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर ८ वर्षांनी २०१५ ला ‘वेलकम बॅक’ प्रदर्शित झाला. आता पुन्हा ८ वर्षांनी २०२३ साली ‘वेलकम ३’ आपल्या भेटीला येत आहे.

Welcome 3 Teaser Cost
Girija Oak Interview: गिरीजा ओकने शेअर केले ‘जवान’च्या सेटवरील मजेशीर किस्से, शाहरुखसोबतच्या बॉंडिंगवर अभिनेत्री म्हणाली...

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com