
Bengali Televison Actress Road Accident: पश्चिम बंगालमधील बारानगर येथील एका टेलिव्हिजन अभिनेत्रीचा लॉरीच्या धडकेत मृत्यू झाला आहे. सुचंद्र दासगुप्ता असं त्या टेलिव्हिजन अभिनेत्रीचे नाव आहे. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री अभिनेत्री सुचंद्र दासगुप्ता शूटिंगवरून घरी परत होती. दुचाकीवरून घरी जाताना बारानगर पोलीस ठाण्याच्या घोषपाडाजवळ एका लॉरीने सुचंद्रच्या दुचाकीला धडक दिली. अपघातामुळे तेथील रोडवरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत देखील झाली होती.
या धडकेत अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेने बारानगर घोषपाडा परिसरात खळबळ उडाली आहे. बारानगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ट्रक चालकाला तात्काळ अटक केली आहे. घटनेची नेमकी वेळ कळत नसल्याने सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेजेस चेक करत आहेत. या घटने संदर्भात सध्या दुचाकी ज्याच्या नावावर आहे, त्याच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने जागीच ब्रेक मारताच क्षणी ती दुचाकीवरून खाली पडली. तेवढ्यात पाठीमागून एक लॉरी येत होती. तिने हेल्मेट घातले होते, तरी देखील तो हेल्मेट तिचा जीव वाचू शकला नाही, त्या ट्रकच्या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाला. सोबतच मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीच्या अंगावरून त्या ड्रायव्हरने ट्रक घातला होता, तिचा जागीच मृत्यू झाला आहे.
सुचंद्र दासगुप्ता ही बंगाली टेलिव्हिजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. नेहमीप्रमाणे काल रात्री देखील ती शूटिंग आटोपून परतत होती. नेहमीप्रमाणे जात असताना तिच्यावर काळाने घाला घातला. अभिनेत्रीचे घर बारानगरमध्ये असल्याची माहिती आहे. काल रात्री शूटिंग आटोपल्यानंतर ती ऑनलाईन बुक केलेल्या बाईकने घरी परतत होती. तिच्या निधनाची बातमी ऐकून कुटुंबीयांसह टेलिव्हिजनसृष्टीवर देखील शोककळा पसरली.
सुचंद्र दासगुप्ता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय बंगाली मालिका 'गौरी'मध्ये सह-अभिनेत्री म्हणून काम करत होती. या मालिकेतून सुचंद्र दासला खूप प्रसिद्धी मिळाली आणि चाहत्यांकडून चांगली प्रसिद्धीही मिळली. सुचंद्र दासगुप्ताच्या निधनावर ज्येष्ठ अभिनेते म्हणतात, सुचंद्र दासने अलीकडच्या काळात टेलिव्हिजन विश्वात खूप नाव कमावले आहे. तिच्या निधनामुळे बंगालच्या उद्योगाला मोठा धक्का बसला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.