Boycott Trend: बॉलिवूडलाच का बॉयकॉट ट्रेंडचा फटका? नेमकं कारण काय?; वाचा सविस्तर...

या वर्षात अनेक बॉलिवूड चित्रपट बॉयकॉटच्या कचाट्यात सापडले आहे.
Boycott Trend
Boycott Trend Saam Tv

Boycott Trend: २०२० मध्ये वैश्विक टाळेबंदीनंतर बॉलिवूडमधील अनेक चित्रपट बॉयकॉटच्या कचाट्यात सापडले होते. २०२२ मध्ये तर अमिरचा 'लाल सिंह चढ्ढा', अक्षयचे तब्बल सहा चित्रपट, आलिया- रणबीरचा 'ब्रह्मास्र' आणि आता शाहरुखचा 'पठाण' चित्रपटावर'बॉयकॉट'ट्रेंड (Boycott Trend) अर्थात बंदी घालण्याची मागणी करणारे हॅशटॅग्ज गेल्या काही दिवसांपासून पुन्हा सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.

Boycott Trend
Shah Rukh Khan: #BoycottShahRukhKhan सोशल मीडियावर ट्रेंड होण्यामागचं खरं कारण आलं समोर

अशाप्रकारे केलेले अथक प्रयत्न चाहते न पाहता बंदी घालणं योग्य आहे का ? आणि त्यामुळे सिनेविश्वात काम करत असलेल्या लहान घटकांना याचा कसा फटका बसत आहे, याचा विचार प्रेक्षकांनी करण्याची सध्या वेळ आली आहे. २०१५ मध्ये आमिरने पत्नी किरण रावला भारतात असुरक्षित वाटत असल्याचे विधान केल्याबद्दल आणि पीके सिनेमात त्याने हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याच्या आरोपावरून आमिरच्या सिनेमावर बहिष्कार घालण्याची मागणी सातत्यानं केली जात होती.

Boycott Trend
OTT Releases This Week: विकेंड ठरणार हाऊसफूल, 'हे' धमाकेदार चित्रपट आणि वेबसिरीज होणार प्रदर्शित

आता तर या मागणीनं प्रत्येक कलाकरांचे चित्रपट बॉयकॉट करण्याचा चांगलाच जोर धरला आहे. केवळ बॉयकॉटमध्ये चित्रपटाच्या यादीत आमिरच नाही, तर अक्षय कुमार, आलिया भट्ट आणि आता शाहरुखच्या सिनेमाचाही यात समावेश केला आहे. (Boycott Trend in India)

अक्षय मुख्य भूमिकेत असलेला रक्षाबंधन चित्रपटाच्या लेखिका कनिका धिल्लनने पूर्वी हिंदुविरोधी ट्विट केल्याच्या आरोपावरून तर आलियाचा ओटीटीवर प्रदर्शित झालेला ‘डार्लिंग’मध्ये पुरुषांवर होणारी घरगुती हिंसा मोठ्या प्रमाणावर दाखवल्याने समाजात चुकीचा संदेश जात असल्याने त्यालाही बहिष्कार करण्याची मागणी केली जात होती.

Boycott Trend
Karan Johar: करणच्या चित्रपटात स्टारकिड्स दिसणार नाहीत; 'या' कारणामुळे घेतला खास निर्णय...

चित्रपट बॉयकॉट नक्की कोणासाठी? कारण काय?

चित्रपट बहिष्काराच्या मागणीत चित्रपटांची यादी पाहिली तर, एका कोणत्याही कलाकारावर मूठभर लोकांच्या मनात असलेला रोष पाहता असे चित्रपट बॉयकॉट केले जात आहेत. त्यामध्ये आमिर खान, शाहरूख खान, सलमान खान, अक्षय कुमार, करण जोहर, आदित्य चोप्रा किंवा जान्हवी कपूर, आलिया भट्ट सारखे दिग्गज कलाकार आणि स्टार किड्सही या यादीत आहेत.

प्रत्येक सिनेमा एका कलाकाराचा नसतो, त्याच्या मागे निर्मिती करण्यांपासून, सिनेमांचं वितरण करणाऱ्यांपर्यंत अनेकजण या प्रक्रियेत असतात. किंबहुना बहिष्काराच्या मागणीमुळे आणि सिनेमा अपयशी ठरल्यामुळे यात सेलिब्रेटींचे काही नुकसान होत नाही, तितकं या स्पॉट बॉईजचे नुकसान होते.

Boycott Trend
Mahesh Manjrekar: महेश मांजरेकरांना आश्रमशाळेच्या संस्थाचालकाच्या विरोधातील वक्तव्य भोवणार?

हजारोंना रोजगार देणाऱ्या बॉलिवूडचं प्रचंड मोठं नुकसान या ट्रेंडमुळे होत आहे. सिनेमाकडे स्वतंत्र कलाकृती म्हणून पाहाण्याऐवजी त्यात काम केलेल्या कलाकाराचे विधान किंवा त्याचे वैयक्तिक मत सिनेमावर बहिष्कार घालण्याची मागणी करणं साफ चुकीचे आहे. त्याचबरोबर असे सिनेमे प्रदर्शित होण्याआधीच त्यावर बंदी घालण्याची मागणी करणे आणखीनच चुकीचे आहे.

कारण त्यामुळे सिनेमा बनवण्यासाठी लागलेला वेळ, त्यातील कष्ट आणि पैसा वाया जाण्याची दाट शक्यता असते. एखाद्या सेलिब्रेटीचं वैयक्तिक आयुष्य, त्याची मतं, आवडीनिवडी आणि त्याचं काम यांची सरमिसळ थांबवणं आता तरी खूप महत्वाचे आहे.

Boycott Trend
Hindustani Bhau: पाकिस्तानी चित्रपटावर हिंदुस्थानी भाऊ भडकला, म्हणाला...

चित्रपट बंदी करण्याच्या ट्रेंडवरुन असे समजते की, एकेकाळी प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या अभिनेते आणि अभिनेत्रींवरच आता प्रेक्षकांचा सर्वाधिक रोष आहे. स्टार किड्सना मिळणाऱ्या संधींवरून बॉलिवूड किती अन्याय करते अशी धारणा प्रेक्षकांमध्ये निर्माण होत आहे. मात्र, घराणेशाही अगदी राजकारणापासून प्रत्येक क्षेत्रात असताना बॉलिवूड प्रकाशझोतात असल्यामुळे ते उठून दिसत आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. (Boycott Trend in India)

Boycott Trend
Ranveer Singh: एनर्जेटीक रणवीरची हळवी बाजू... व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल रिअल हीरो

बॉलिवूडमध्ये फक्त घराणेशाही चालत असेल तर आयुषमान खुराना, सिद्धांत चतुर्वेदी, क्रीती सेनॉन, कार्तिक आर्यन सारखे कलाकार आज प्रेक्षकांसमोर कदाचित समोर नसते आले. किंबहूना ट्विंकल खन्ना, तुषार कपूर, सोहा अली खान, प्रतीक बब्बर हे सुद्धा आज इंडस्ट्रीत यशाच्या शिखरावर पोहोचले नसते. सध्याचे चित्रपट कलाकार, संगीत, निर्मिती मूल्य यापेक्षा विषय किंवा कथानकाच्या जोरावर चालले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com