
बॉलिवुडचा हॅंडसम हंक ऋतिक रोशन आपल्या फिटनेस आणि डान्समुळे प्रसिद्ध आहे. तो वेळावेळी आपल्या कामाबाबतचे फोटोज सोशल मीडियावर शेयर करत असतो. चाहतेही त्याला भरभरुन प्रेम देत असतात. आज त्याने इंस्टाग्रामवर एक मिरर सेल्फी पोस्ट केली. त्यात नेटकऱ्यांना असं काही दिसलं की, काही नेटकऱ्यांनी त्याची खिल्ली उडवायला सुरुवात केली. मात्र ऋतिकने खिल्ली उडवणाऱ्यांना त्याच्या खास मिश्किल अंदाजात उत्तर दिलं ज्यामुळे शरीरानेच नाही तर मनाने देखील प्रसन्न असल्याचं लक्षात येतं. (What was seen in Hrithik Roshan's selfie was that people made fun of him ...)
हे देखील पहा -
ऋतिकने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या मिरर सेल्फीमध्ये त्याची आई बाल्कनीत उभी दिसत आहे आणि ऋतिक खुर्चीवर बसून सेल्फी घेत आहे. मात्र हे नेटकऱ्यांच्या टीकेचं खरं कारण नाही. नेटकऱ्यांच्या खिल्ली उडवण्याचं खरं कारण म्हणजे ऋतिकच्या घरातील भिंतीला आलेली ओल...होय एवढ्या शुल्लक गोष्टीवरुन काही नेटकरी ऋतिकची खिल्ली उडवतायत. तसं पाहायला गेलं तर सेलिब्रिटींच घर एखाद्या महालापेक्षा कमी नसतं. घरातल्या भिंतीपासून ते बाथरुमपर्यंत सगळ्या गोष्टी आलिशान असतात. मात्र सर्वसामान्यांच्या घरांच्या भिंतील जशी ओल लागते तशीच ओली भिंत चक्क ऋतिकच्याही घरी दिसल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं आहे त्यामुळे काहींनी याची खिल्ली उडवली तर काहींनी ऋतिकला अजब-गजब सल्ले दिले आहेत.
एका यूजरने लिहीलं की, ''आपके घर मे भी दिवारों मे पपडी बनती है?'' तर दुसऱ्याने विचारलं ''सर तुमची भिंत लिकेज आहे का?'' आणखी एका युजरने तर ऋतिकला घराला रंग देण्याचा सल्ला दिला सोबचत इतक्या पैशांचं काय करणार असाही प्रश्न विचारला. ऋतिकनेही हे मनावर न घेता खास मिश्किल अंदाजात लिहीलं की, ओल नसेल तर ओल नीट करण्यात मजा कशी येईल, सध्या माझे घर भाड्याचे आहे, लवकरचं मी स्वतःचे घर घेणार आहे अशी कमेंट त्याने केली. चाहत्यांना त्याचा हा पॉझिटीव्ह अॅटीट्यूड फारच आवडला. तो लकवरच दिपिकासोबत फायटर चित्रपटात दिसणार आहे.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.