'उद्या कोकेन घेऊ'; आर्यन-अनन्यामधील व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स उघड

आणखी एका चॅटमध्ये ड्रग पेडलर हा अनन्या पांडेसोबत ड्रग्ज बद्दल बोलताना दिसत आहे.
'उद्या कोकेन घेऊ'; आर्यन-अनन्यामधील व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स उघड
'उद्या कोकेन घेऊ'; आर्यन-अनन्यामधील व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स उघडSaam Tv

मुंबई - आर्यन खान आणि अनन्या पांडे या दोघांमधील व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स आता समोर आले आहेत. यामध्ये दोघेही ड्रग्ज बाबत बोलताना स्पष्ट दिसून येत आहे. आर्यनने १८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजून २७ मिनिटांनी 'उद्या कोकेन घेऊयात' असा मेसेज बिलाल आणि मानव या दोघांना केला होता. तर आणखी एका चॅटमध्ये ड्रग पेडलर हा अनन्या पांडेसोबत ड्रग्ज बद्दल बोलताना दिसत आहे.

हे देखील पहा -

६ सप्टेंबर रोजी ड्रग पेडलर आणि अनन्या पांडे यांच्यात झालेले व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स-

ड्रग पेडलर- 'गांजा'

अनन्या - त्याची मागणी आहे.

ड्रग पेडलर - मी तुझ्याकडून गुप्तपणे घेईन.

अनन्या - ठीक आहे.

ड्रग पेडलर- तू गांजा आणलास का?

अनन्या- मी मिळवत आहे.

'उद्या कोकेन घेऊ'; आर्यन-अनन्यामधील व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स उघड
सोलापूरात वीज तोडणी प्रश्न ऐरणीवर; डीपीडीसी बैठकीत एकच हल्लाबोल

व्हाँट्सवर १८ एप्रिल रोजी आर्यय खानने दुपारी ३ वा. २७ मिनिटांनी केलेले व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स-

आर्यन खान- उद्या कोकेन घेऊयात, असा मेसेज बिलाल व मानव न्यू यांना पाठवलाय

तसेच खाली ३. २७ वा पून्हा दुसरा मेसेज पाठवलाय

I am getting you guys ......

परत आर्यननेन ३ . २७ मिनिटांनी तिसरा मेसेज केला

By Ncb असं म्हटलयं

आर्यन खानबरोबर अनन्याचे ड्रग्ज संबंधी चॅटचे पुरावे एनसीबीकडे आहेत. यातूनच अनन्याची चौकशी एनसीबी करीत आहे. अनन्याच्या वांद्रे इथल्या घरावर गुरुवारी एनसीबीने छापेमारी करीत तिचा मोबाईल व लॅपटॉप जप्त केला होता. त्यानंतर तिची मुंबई एनसीबी ऑफिसमध्ये चौकशी करण्यात आली होती. तर दुसरीकडे आर्यन खान सध्या आर्थर रोड कारागृहात आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com