'एआर रहमान कोण आहे'? तेलुगू अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

नंदामुरी बालकृष्ण म्हणाले, 'एआर रहमान कोण आहे हे मला माहित नाही. त्याने ऑस्कर जिंकला आणि तो कोण आहे हे मलासुद्धा माहिती नाही. तो दशकात एकदा हिट गाणी देतो.
'एआर रहमान कोण आहे'? तेलुगू अभिनेत्याचे वादग्रस्त विधान
'एआर रहमान कोण आहे? तेलुगू अभिनेत्याचे वादग्रस्त विधानSaam Tv

पुणे : तेलगू अभिनेता आणि नेते नंदामुरी बालकृष्ण Nandamuri Balakrushna यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. तेलगू टीव्ही वाहिनीशी झालेल्या संभाषणात बालकृष्ण म्हणाले, 'एआर रहमान AR Rahman कोण आहे हे त्यांना माहिती नाही.' यानंतर त्यांनी भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न Bharatratrn विषयी वादग्रस्त विधानही केले. ते म्हणाले की, भारतरत्न त्यांचे वडिल एनटीआरच्या नखांच्या समान आहे.

'एआर रहमान दशकात एकदा हिट गाणी देतो' बालकृष्ण असे काही विधान करून एक नवीन वाद निर्माण करतात. अलीकडेच त्यांनी तेलगू दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटातील व्यक्तिरेख्यांविषयी काही कठोर टीका केली होती.

'एआर रहमान कोण आहे? तेलुगू अभिनेत्याचे वादग्रस्त विधान
मेहकर तहसील कार्यालयातील सर्व विभागाचे कुलूप अज्ञाताने फोडले !

अलीकडेच ते म्हणाले, 'ए.आर. रहमान कोण आहे ते मला माहित नाही. त्याने ऑस्कर जिंकला आणि तो कोण आहे हे मलासुद्धा माहिती नाही. तो दशकात एकदा हिट गाणी देतो. पुरस्कारांविषयी बोलताना ते म्हणाले, "मला वाटते की भारतरत्न माझ्या वडिलांच्या (एनटीआर) नखांच्या बरोबरीचा आहे. माझ्या कुटुंबातील टॉलीवूडमधील योगदानाची भरपाई कोणताही पुरस्कार करू शकत नाही. ही मुलाखत प्रसारित होताच ए.आर. रहमानच्या चाहत्यांनी बालकृष्णाला ट्रोल troll करण्यास सुरुवात केली.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com