Bigg Bossच्या घरातून का बाहेर पडला अक्षय वाघमारे ?; जाणून घ्या त्याच्याकडूनच...(पहा व्हिडिओ)

कलर्स मराठीवर 'बिग बॉस मराठी'चं ३ पर्व Bigg Boss Marathi 3 बऱ्याच कारणाने चर्चेला उगान येत आहे
Bigg Bossच्या घरातून का बाहेर पडला अक्षय वाघमारे ?; जाणून घ्या त्याच्याकडूनच...(पहा व्हिडिओ)
Bigg Bossच्या घरातून का बाहेर पडला अक्षय वाघमारे ?; जाणून घ्या त्याच्याकडूनच...(पहा व्हिडिओ)Saam Tv

Bigg Boss Marathi 3: कलर्स मराठीवर 'बिग बॉस मराठी'चं ३ पर्व Bigg Boss Marathi 3 बऱ्याच कारणाने चर्चेला उगान येत आहे. अगदी पहिल्या दिवसापासून स्पर्धकात असलेले वादविवाद, भांडणे यामुळे घर चांगलेच दणाणून गेले आहे. अवघ्या १०- १२ दिवसामध्ये या घरात ३ ग्रुप पडल्याचे बघायला मिळाले आहे. बिग बॉसच्या घरात आता नॉमिनेशन प्रक्रियेला देखील सुरुवात झाली आहे.

पहा व्हिडिओ-

या घरात आता प्रत्येक आठवड्याला एका सदस्याला घराबाहेर जाणे अनिवार्य राहणार आहे. या आठवड्यात सुरेखा कुडची, अक्षय वाघमारे, संतोष चौधरी (दादुस), विशाल निकम, तृप्ती देसाई आणि स्नेहा वाघ हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेत नॉमिनेट झाले होते. परंतु, अक्षय वाघमारेचा प्रवास अर्ध्यावरच थांबला आणि त्याला बिग बॉसच्या घरामधून बाहेर पडावे लागणार आहे. मात्र, अक्षय घराबाहेर गेल्यावर एका नव्या स्पर्धकाची घरात एण्ट्री होणार आहे. अक्षय वाघमारे akshay waghmare घरातून बाहेर पडल्यावर एका प्रसिद्ध अभिनेत्याची घरात सरप्राइज एण्ट्री झाली आहे.

Bigg Bossच्या घरातून का बाहेर पडला अक्षय वाघमारे ?; जाणून घ्या त्याच्याकडूनच...(पहा व्हिडिओ)
Nashik | नाशिकमध्ये रेल्वे कर्मचाऱ्याची आत्महत्या... (पहा व्हिडिओ)

'रात्रीस खेळ चाले' या सिरीयल मधील अभिनेता आदिश वैद्य यांने बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एण्ट्री झाली आहे. दरम्यान, बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझन मध्ये घरामधून बाहेर पडणारा पहिला सदस्य अक्षय वाघमारे हा ठरला आहे. आता येणाऱ्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होणार? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवणार? आणि कोण घराबाहेर जाणार? हे बघणे रंजक ठरणार आहे. तसेच आदिशच्या अचानक घरामध्ये झालेल्या एण्ट्रीमुळे आता घरात सदस्यांची काय प्रतिक्रिया असणार आहे? घरामध्ये कोणते नवीन रंजक वळण येणार? हे बघणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.