Lata Mangeshkar : 3 महिने चालताही येत नव्हतं; 'या' गंभीर आजाराने लतादीदी होत्या त्रस्त

लतादीदी 33 वर्षांच्या असताना त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता.
Lata Mangeshkar
Lata MangeshkarSaam Tv

Slow Poison Is Given To Lata Mangeshkar : भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांना जाऊन आज एक वर्ष झालं आहे. गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजे ६ फेब्रुवारी, २०२२ रोजी त्यांचे निधन झाले. आजही त्यांची गाणी आणि आठवणी भारतीयांच्या स्मरणात आहेत.

लता मंगेशकर यांना खूप प्रसिद्धी आणि प्रेम मिळाले. परंतु लतादीदींच्या कारकिर्दीत एक भयानक टप्पाही आला होता. एका मुलाखतीत खुद्द लता मंगेशकर यांनी याविषयी केला होता. लतादीदी 33 वर्षांच्या असताना त्यांना कोणीतरी विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला होता.

Lata Mangeshkar
Lata Mangeshkar Death Anniversary: '...लता दीदींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन', राज ठाकरेंनी दिला आठवणींना उजाळा

1963 मध्ये लतादीदींना स्लो पॉयझन देण्यात आले. घटनेची आठवण करून देताना त्या म्हणाल्या होत्या की, मला अंथरुणावरून उठताही येत नव्हते आणि हे जवळपास तीन महिने सुरू होते. परिस्थिती इतकी वाईट होती की मला स्वतःहून चालताही येत नव्हते.

लता मंगेशकर यांनी सांगितले की, त्यांना स्लो पॉयझनने मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामागे कोण आहे हे त्यांना कळले होते. पण कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय त्या पोलिसात तक्रार करू शकत नव्हत्या. त्यामुळे त्या व्यक्तीचे नाव कधीच समोर आले नाही.

मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले होते की, विषबाधेमुळे लतादीदींचा आवाज देखील गेला होता. परंतु लता मंगेशकर यांनी स्वतः ही गोष्ट नाकारली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांचा आवाज कधीच गेला नाही, त्या फक्त अफवा होत्या.

तब्येत बरी झाल्यानंतर त्यांनी हेमंत कुमार यांचे 'कही दीप जल कही दिल' हे गाणे गायले. हेमंत कुमार यांनी लतादीदींच्या आईची परवानगी घेऊन त्यांनी स्वत: त्यांना रेकॉर्डिंग स्टुडिओत नेले. लतादीदींच्या आईने सांगिलते होते की, त्यांच्या मुलीला रेकॉर्डिंगमध्ये काही अडचण आली तर ते तिला लगेच घरी घेऊन यावं. पण रेकॉर्डिंग व्यवस्थित पार पडले आणि त्या घटनेनंतर लतादीदींनी पुन्हा गाणे सुरू केले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com