Salman Khan On Pathan: पठानच्या यशाचं खरं श्रेय कुणाचं? शाहरुख की सलमान? भाईजानने स्पष्टच सांगितलं

Secret Of Pathan Success: खुद्द सलमाननेच 'पठान' हिट झाला यात त्याचा हात नसल्याचे सांगितले आहे.
Salman Khan On Pathan: पठानच्या यशाचं खरं श्रेय कुणाचं? शाहरुख की सलमान? भाईजानने स्पष्टच सांगितलं

Salman Khan Reveals Pathan Movie Success: शाहरुख खानचा पठान हा 2023 सालचा सर्वात हिट बॉलिवूड चित्रपट ठरला. सलमान खानचा चित्रपटातील कॅमिओ हा चर्चेचा मुद्दा होता. सलमानच्या एन्ट्री वातावरण निर्मिती झाली. शाहरुखला त्याच्या कमबॅक चित्रपटासाठी सलमानची गरज आहे आणि सलमानमुळे पठान हिट झाला असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. पण आता खुद्द सलमाननेच 'पठान' हिट झाला यात त्याचा हात नसल्याचे सांगितले आहे. याचे संपूर्ण श्रेय सलमानने शाहरुख खानला दिले आहे.

सलमान खान नुकताच 'आप की अदालत'मध्ये गेला होता. तिथे रजत शर्मा यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले त्यातील एक पठानवर होता. 'तुमच्यामुळे 'पठान' चालला की काय.' यावर सलमानला स्पष्ट उत्तर दिलं.

सलमान म्हणाला, 'अजिबात नाही. हे श्रेय शाहरुख खानकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आदित्य चोप्राकडून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. अजिबात नाही. शाहरुखने उत्तम काम केले आहे. हे सर्व चाहते शाहरुखचा चित्रपट पाहण्यासाठी आसुसले होते. योग्य वेळी, योग्य प्रसंगी योग्य पिक्चर आला. मला वाटतं 'पठान' हा हिंदी चित्रपटसृष्टीचा सर्वात मोठा हिट चित्रपट आहे.

'पठान' हा या वर्षातील सर्वात हिट चित्रपट होता. बॉलिवूडमधील आतापर्यंतचा सर्वात जास्त कामे करणारा चित्रपट ठरला. बॉलीवूड हंगामानुसार, चित्रपटाने देशभरात 543.05 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. शाहरुखला पहिल्यांदाच एवढी भारी अ‍ॅक्शन करताना पाहून लोकांना मजा आली.

सलमानसोबत त्याची केमिस्ट्रीही प्रेक्षकांनी एन्जॉय केली. शाहरुख-सलमानचे सीन्स प्रेक्षकांना विशेष आवडले. 'पठान'नंतर हे दोघे 'टायगर 3'मध्येही दिसणार आहेत. या चित्रपटाच्या दमदार अॅक्शन सीनमध्ये दोघेही स्क्रीन शेअर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या सीनवर अनेक दिग्दर्शक काम करणार आहेत.

या दोन अभिनेत्यांच्या स्टार पॉवरचा फायदा घेण्यासाठी YRF टायगर Vs पठान बनवणार असल्याची चर्चा होत आहे. जिथे ही दोन्ही पात्रे एकमेकांसमोर असतील. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर चित्रपटाची कथा कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉरपासून प्रेरित असेल. टायगर आणि पठान यांच्यात काही गैरसमज असतील. त्यामुळे दोघेही आधी एकमेकांशी भांडणार आणि मग शेवटी सगळे गैरसमज दार करून एकत्र येतील.

'पठान'च्या यशानंतर आदित्य चोप्रा त्याच्या स्पाय युनिव्हर्सचा विस्तार करण्यासाठी खूप मेहनत करत आहे. शाहरुख, सलमान, दीपिका, कतरिना आणि हृतिक सारखे कलाकार आधीच या विश्वाचा एक भाग आहेत. वॉर 2 मध्ये ज्युनियर एनटीआर दिसणार असल्याची चर्चा आहे. तर आणखी दिग्गज कलाकार या स्पाय युनिव्हर्समध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com