Will Smith म्हणतो 'अनेक महिलांसोबत सेक्स करुन आजारी पडलो'

वयाच्या १६ व्या वर्षी पहिलं ब्रेकअप; त्यानंतर अनेक महिलांसोबत सेक्स; Will Smith ची कहाणी
Will Smith म्हणतो 'अनेक महिलांसोबत सेक्स करुन आजारी पडलो'
Will Smith म्हणतो 'अनेक महिलांसोबत सेक्स करुन आजारी पडलो'Saam Tv

हॉलिवूडचा (Hollywood) सुपरस्टार विल स्मिथच्या (Will Smith) आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते नेहमी उत्सुक असतात पण त्यांच्या आयुष्याशी निगडीत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आजपर्यंत त्याच्याचाहत्यांना माहित नव्हत्या. अलीकडेच, विल स्मिथचे एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला हे पुस्तक प्रसिद्ध झालं. या पुस्तकात त्याने त्याचे आजवरचे आयुष्य आणि त्यांचे अनुभव सांगितले आहेत. त्यानंतर विल चर्चेत आहे.

हे देखील पहा -

विलने आपल्या पुस्तकात एक मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्याने आपल्या पुस्तकात लिहले आहे की, त्याच्या गर्लफ्रेंडशी ब्रेकअप झाल्यानंतर त्याने अनेक महिलांशी शारिरीक संबंध ठेवले होते आणि त्यामुळे तो आजारी पडला. ज्या मुलीसोबत त्याचे ब्रेकअप झाले ती मुलगी 16 वर्षांची होती. विल स्मिथ म्हणाला, 'ब्रेकअप माझ्यासाठी असह्य झाला होता. त्यानंतर मी अनेक महिलांशी शारिरीक संबंध ठेवले. विलने असे का केले याचे कारणही त्याने सांगितले आहे. मला आराम हवा होता कारण हार्टब्रेकवर औषध नाही त्यामुळे मी अनेक महिलांशी जवळीक साधू लागलो.

Will Smith म्हणतो 'अनेक महिलांसोबत सेक्स करुन आजारी पडलो'
रायगडात सहा नगरपंचायतीचे निवडणुकीचे बिगुल वाजले...

मुलीवरून आपलं लक्ष वळवण्यासाठी आणि डिप्रेशन टाळण्यासाठी, मी भरपूर शॉपिंग करण्याचा आणि अनेक मुलींशी संबंध ठेवण्याचा अवलंब केला. रिलेशनशिपमध्ये असताना मी फक्त एका मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले होते पण ब्रेकअपनंतर मी अनेक मुलींसोबत शारीरिक संबंध ठेवायला सुरुवात केली आणि त्याने माजी तब्येत बिघडली असे देखील विल स्मिथने सांगितले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com