Wow! या कलाकारांनी लतादीदींना खळखळून हसवलं; दीदींनी स्वअक्षरात थेट गिफ्ट पाठवलं

मराठी कॉमेडी शो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील या दोन्ही कलाकारांना थेट लतादीदींनी भेट पाठवली आहे, त्यामुळे हे दोन्ही कलाकार भारावून गेले आहेत.
Wow! या कलाकारांनी लतादीदींना खळखळून हसवलं; दीदींनी स्वअक्षरात थेट गिफ्ट पाठवलं
Wow! या कलाकारांनी लतादीदींना खळखळून हसवलं; दीदींनी स्वअक्षरात थेट गिफ्ट पाठवलंSaam Tv

भारताची कोकीळा गाणसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर म्हणजेच लतादीदी यांना गाण्यासोबतच इतर कलेचीही आवड आहे. म्हणूनच तर ते अनेकदा अभिनय आणि विविध क्षेत्रातल्या कलाकारांचं तोंड भरून कौतुक करत असतात. लतादीदींकडून (Lata Mangeshkar) कौतुक मिळणं म्हणजे एखादा राष्ट्रीय पुरस्कार मिळण्यासारखं असतं अशी अनेकांची भावना आहे. असाच एक प्रत्यय आलाय हास्यकलाकार (Comedy Actors) असलेले समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार यांना... 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या मराठी कॉमेडी शो मधील या दोन्ही कलाकारांना थेट लतादीदींनी भेट पाठवली आहे, त्यामुळे हे दोन्ही कलाकार भारावून गेले आहेत. (Wow! These artists made Latadidi laugh out loud; Didi sent the gift directly in her own handwriting)

हे देखील पहा -

त्याचं झालं असं की, लतादीदींना 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम भरपुर आवडतो, ते हा कार्यक्रम नियमितपणे बघत असातात आणि खळखळून हसतात. खासकरुन समीर चौघुले (Samir Choughule) आणि विशाख सुभेदार यांच्या कॉमेडीची केमिस्ट्री लतादीदींना फारच आवडते. त्यामुळेच आपल्या आवडत्या कलाकारांचं कौतुक करण्यासाठी लतादीदींनी समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar) या दोघांनाही कुरीयरद्वारे भेटवस्तू पाठवली आहे. विशेष म्हणजे या भेटवस्तूच्या पॅकींग/कव्हरवर लतादीदींनी स्वतःच्या अक्षरात शुभेच्छा लिहील्या आहेत. लतादीदींनी केलेल्या या कौतुकामुळे दोघे कलाकर भारावून गेले आहेत.

अभिनेता समीर चौघुले म्हणाला की,

निसर्ग किती ग्रेट आहे न !शब्द संपले की भावनांना वाट मिळावी म्हणून त्याने अश्रूंची निर्मिती केली...आज ते प्रकर्षाने जाणवलं...आज सुरांची आणि स्वरांची सरस्वती आदरणीय लता मंगेशकर दीदींनी अत्यंत प्रेमाने घरी एक भेटवस्तू आणि माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ट्रॉफी पाठवली. आणि ती ट्रॉफी म्हणजे दिदींच्या हस्ताक्षरातील शुभेच्छा आणि आशीर्वाद....थिजून जाणं म्हणजे काय ते आज मला कळलं..लतादीदी महाराष्ट्राची हास्यजत्रा नेहेमी बघतात आणि खूप हसतात....एन्जॉय करतात ही आम्हा महाराष्ट्राची हास्यजत्रा कुटुंबियांसाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे.

हा सुवर्ण क्षण आयुष्यात आला तो फक्त आणि फक्त आमच्या हास्यजत्रा कुटुंबामुळे..मनःपूर्वक आभार सोनी मराठीचे हेड श्री. अजय भालवणकरसर, नॉन फिक्शन हेड अमित फाळकेसर, ईपी गणेश सागडे, सिद्धूगुरू जुवेकर . आणि आमचं विद्यापीठ सचिन गोस्वामी सर आणि सचिन मोटे सर.........ज्यांच्या मार्गदर्शनाशिवाय हे केवळ अशक्य होतं ...आणि खास आभार माझी पार्टनर विशाखा सुभेदार ..vishu आपल्या जोडीच्या यशात तुझा खूप मोठा वाटा आहे..तुझ्या शिवाय मी अपूर्ण आहे... Vishakha Subhedar thank you... आणि a big thank you to my Maharashtrachi hasyajatra family ...अमीर हडकर आणि संपूर्ण बँड, दिग्दर्शन टीम, प्रोडक्शन टीम backstage चे सगळे कलाकार आणि Prasad Oak आणि @sai tamhankar thank you for your support..आणि आमची लाडकी प्राजक्ता ..या मागे तुझ्या वा दादा वाचा ही खूप मोठा हात आहे आणि मयुरेश पई Mayuresh Satish Pai thank you thank you.....भरून पावलो ..आयुष्य सार्थकी लागलं . रसिकांनो असाच आशीर्वाद कायम पाठीशी राहू दे.. Sony मराठी Amit Phalke अशा शब्दांत अभिनेता समीर चौघुले याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिनेत्री विशाखा सुभेदारही लतादीदींच्या या कौतुकाने भारावून गेली आहे, ती म्हणाली की,

काय बोलू... शब्द हरवले आणि डोळे वाहू लागले...

घरी एक पार्सल आलं आणि त्यावर एक card होतं आणि चमचमत्या कागदात गुंडाळून एक " क्षण "आला, जो "सुख "आणि "आनंद "घेऊनच आला ...!

त्यावरच नाव वाचलं. आणि दोन सेकंद धस्स झालं काळजात..

लता मंगेशकर...!

त्या कायम हास्यजत्रा पाहतात, आणि त्यांना आमचं काम आवडत म्हणून

त्यांनी आशीर्वाद रुपी भेट पाठवली.

त्यांनी केलेले हे कामाचं कौतुक आणि आवर्जून पाठवलेली भेट.

मी ठार झालेय खरंतर... देवा अजून काय हवयं...!

ह्यासाठी मी कायम

" महाराष्ट्राची हास्यजत्रा "ची आभारी असेन.

आणि ज्यांनी आम्हाला घडवलं ते Sachin Goswami आणि Sachin Mote आणि सोनी मराठी चे देखील आभार... Amit Phalke, अजय भालवणकर, आणि आमची संपूर्ण जत्रेची टीम

आणि ह्या यशात तुझ्याशिवाय सम्या Samir Choughule काहीही शक्य नव्हतं..

Thank u.. अशा शब्दांत अभिनेत्री विशाखा सुभेदारने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Wow! या कलाकारांनी लतादीदींना खळखळून हसवलं; दीदींनी स्वअक्षरात थेट गिफ्ट पाठवलं
'गाय दूध देत नाही'! म्हणून शेतकऱ्याने केली पोलीस ठाण्यात तक्रार

एकुणच पाहता या दोन्ही कलाकारांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यांनी लतादीदींच्या या भेटरुपी आशीर्वादाबद्दल लतादीदींचे आभार मानले आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मराठी कॉमेडी शो ची प्रसिद्धी एवढी आहे की खुद्द बिग बी - अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीदेखील या कार्यक्रमाचं आणि त्यातील कलाकरांसह संपुर्ण टीमचं कौतुक केलं होतं.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com