Urfi Javed: चेतन भगत-उर्फी जावेद यांच्यातील युद्ध रंगले, लेखकांचा उर्फीवर पलटवार केला

उर्फी आणि चेतन भगत यांच्यात सोशल मीडियावर वाद सुरू झाला. उर्फीच्या पोस्टनंतर आता चेतन भगतने एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्याने तिचे नाव न घेता उर्फीला उत्तर दिले आहे.
Urfi Javed
Urfi JavedSaam Tv

Urfi Javed: बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद फॅशन सेन्स आणि तिच्या बोल्ड लूकने सर्वच ठिकाणी चर्चेत असते. अलीकडेच, उर्फी चेतन भगतवर चांगलीच संतापली होती, त्याचे कारण म्हणजे लेखक चेतन भगतचे तिच्यावरील वक्तव्य. ज्यामध्ये ते म्हणाले की उर्फी 'तरुणांना बिघडवत आहे'. उर्फीला चेतन भगतचे हे विधान आवडले नसून उर्फीने सोशल मीडियाच्या माध्यमातून लेखकावर टीका केली आहे. त्यावर आता चेतन भगतनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Urfi Javed
Amisha Patel: बीचप्रेमी अमिषा पटेलच्या बोल्डनेसने चाहत्यांना केले गार

उर्फी जावेदच्या वक्तव्यावर चेतन भगत यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली की, 'मी कधीही बोललो/चॅट केले/भेटलो/ओळख निर्माण केलेली नाही. काही नेटकऱ्यांनी मी तिच्यासोबत बोलत असल्याचा दावा केला आहे. परंतू हे सर्व खोटे आहे. कोणावरही टीका केली नाही आणि मला असेही वाटते की इंस्टाग्रामवर लोकांना वेळ वाया घालवण्यापासून थांबवण्यात उत्तम आहे. आजच्या तरुण पिढीला फिटनेस आणि करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी काहीच गैर नाही.

Urfi Javed
Prabhas- Kriti: चित्रपटात दिसणारी 'ही' जोडी रियल लाईफमध्ये पण एकत्र दिसणार का ? वरुणने सांगितले स्पष्ट कारण

मात्र, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये कोणाचेही नाव लिहिलेले नाही. अलीकडेच चेतन भगत यांनी उर्फी जावेदबद्दल एका इव्हेंटमध्ये सांगितले होते की, 'आजचे युवक उर्फी जावेदचे व्हिडिओ पाहत आहेत आणि तिचे फोटो लाइक करत आहेत. कपड्याबद्दल इथे उर्फीची चूक नाही. ती तिचे करिअर घडवत आहे. लोकं तिच्या फोटोंचा गैरवापर करत आहेत.

Urfi Javed
Kiara- Siddharth Wedding: कियारा- सिद्धार्थ लग्नबेढीत अडकणार, लवकरच तारीख करणार जाहीर

यावर उर्फी बोलली की, 'तुमच्या मानसिकतेचा लोकं गैरवापर करत बलात्काराला प्रोत्साहन देत आहेत. हे थांबवा. पुरुष चुका करत राहतात आणि त्यासाठी महिलांना दोष दिला जातो. ही 80 च्या दशकातील गोष्ट झाली चेतनजी. तरूणांना बिघडवण्याबद्दल, तुमच्यासारखे लोक त्यांना शिकवत आहेत की त्यांच्या चुकांचा दोष दुसर्‍यावर कसा लावायचा. तुम्ही माझी नव्हे तर तरुणांची दिशाभूल करत आहात.

आता या टीका टिप्पणीला अजून कोणते वेगळे वळण लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com