
Raj Thackeray In Avdhoot Gupte Show: संगीतकार, गायक, निर्माता आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते याचा 'खुपते तिथे गुप्ते' हा शो खूप गाजला होता. आता 'खुपते तिथे गुप्ते'चे नवे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'खुपते तिथे गुप्ते'च्या नवीन पर्वाच्या पहिल्या भागात राज ठाकरे उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे.
'खुपते तिथे गुप्ते' या शोची घोषणा झाल्यापासून या शोचे चाहते खूप उत्सुक आहेत. या पर्वत कोणकोणत्या नवीन लोकांना भेटता येणार, त्यांना काय खुपतंय हे जाणून घेण्यासाठी सारेच उत्सुक आहेत. या नव्या पर्वाच्या पहिल्या भगत माणसे अध्य्क्ष राज ठाकरे हजेरी लावणार आहेत. या शोच्या पहिल्या भागाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. (Latest Entertainment News)
झी मराठी वाहिनीने त्यांच्या सोशल मीडियावर एक विडिओ शेअर केला आहे. तो व्हिडिओ पाहून तुमच्या सहज लक्षात येईल की या व्हिडिओमध्ये दिसणारे व्यक्तिमत्व कोण आहे. हातांच्या हालचाली, खिशातील चष्मा, पायात लेदरच्या मोजडी, निळा खादीचा सादर आणि सफेद लेहंगा असा लूक या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
तर झी मराठीने त्यांच्या सोशल मीडियावर वर व्हिडिओसह कॅप्शन देत लिहिले आहे की, 'तुम्हाला काय वाटतं…? या प्रश्नोत्तरांच्या खुर्चीत बसणारे पहिले वहिले व्यक्तिमत्त्व कोण?' त्यांच्या या पोस्टवर नेकऱ्यांसह मराठी सेलिब्रिटी देखील कमेंट करत आहेत. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने 'साहेब' हार्ट कमेंट केले आहेत. तर शर्मिष्ठा राऊतने 'मित्रा' अशी कमेंट केली आहे. तर अनेकजण साहबे, राज ठाकरे अश्या कमेंट करत आहेत.
'खुपते तिथे गुप्ते' या शोमध्ये पहिल्या भागात राज ठाकरे येणार असल्याने या शोची अजून चर्चा होणार यात वादच नाही.
'खुपते तिथे गुप्ते' हा शो 4 जूनपासून सुरु होणार आहे. 4 जून 2023 पासून दर रविवारी रात्री 9 वाजता हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तर राज ठाकरे यांची मुलाखत पहिल्याच भागात म्हणजे 4 जूनला पाहता येणार आहे. तर अवधूत गुप्ते, राज ठाकरे यांना काय प्रश्न विचारणा आणि त्याची उत्तरे काय मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
तर या शोची टॅगलाईन देखील खुपणार नाहीतर टोचणार अशी आहे. त्यामुळे हे पर्व अधिक रंजक असणार यात शंका नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.