७१ व्या वर्षी सोशल मीडियावर यावंसं का वाटलं? Zeenat Amaan यांनी सांगितलं 'हे' खास कारण

झीनत अमान यांनी आपण इन्स्टावर का आलो याविषयी स्पष्टीकरण देत कारण सांगितले आणि सगळ्यांना थक्क करून सोडलं.
zeenat aman shares why she is on instagram
zeenat aman shares why she is on instagramInstagram/ @thezeenataman

Zeenat Amaan: झीनत अमान ११ फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर येताच त्यांची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. बॉलिवूडच्या या दिग्गज अभिनेत्रीने सोशल मीडियावर दमदार पदार्पण करताच, तिच्या सिनेसृष्टीतील प्रवासाबद्दल माहिती दिली आहे. त्यानंतर झीनतने आपल्या काही जुन्या आठवणी,किस्से,फोटो शेअर करत आहे.

zeenat aman shares why she is on instagram
डर के आगे जित है..., Khatron Ke Khiladi 13 मध्ये उर्फीसोबत दिसणार 'हे' सेलिब्रिटी

अवघ्या काही दिवसातच झीनत यांनी सोशल मीडियावर 82.8k पेक्षाही अधिच चाहते कमावले आहेत. यावरुन सिद्ध होते की, अभिनेत्रीच्या चाहत्यांची लिस्ट आजही भलीमोठी आहे. लेटेस्ट पोस्टमधून झीनत अमान यांनी आपण इन्स्टावर का आलो याविषयी स्पष्टीकरण देत कारण सांगितले आणि सगळ्यांना थक्क करून सोडलं.

झीनत अमान सध्या आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे सर्वत्रच चर्चेचा विषय ठरल्या आहेत. ज्यात त्या खुर्चीवर बसलेल्या दिसत आहेत. त्या फोटोसोबत त्यांनी लांबलचक पोस्ट देखील लिहिली आहे.त्यांनी आपल्या चाहत्यांनी केलेल्या मेसेजेससाठी, कमेंट्ससाठी त्यांचे आभारही मानले आहेत.

झीनत अमान सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणतात, "एवढ्या सगळ्या मेसेजेसना उत्तर देणं शक्य नाही. त्यामुळे माझ्याकडून धन्यवादाचा स्विकार करा. मी माझी मुलं अजान आणि जहानसोबत इन्स्टाग्रामवर आलोय. त्याचं उद्दिष्ट्य काय आहे,याची चर्चा करत होती. मला वाटतं की मी इन्स्टाग्रामवर समाजासाठी जे मुद्दे बोलणं गरजेचे आहेत त्यांना अधिक महत्त्व देईन."

झीनत अमान पुढे म्हणतात, "२००६ मध्ये माझा पहिला कुत्रा राफेलला दत्तक घेतले पण त्याअगोदर पासूनच माझ्या मनात मुक्या जनावरांप्रती प्रेम होतं. रॅफीच्या येण्यानं, त्याच्या प्रेमानं मी पुरती बदलले. त्यानं मला सगळ्या प्राण्यांकडे प्रेमळ नजरने पहायला शिकवलं. पशु कल्याण.. खरचं एक अशी गोष्ट आहे ज्याच्याप्रती मी इन्स्टाग्रामवर अधिक भाष्य करेन."

zeenat aman shares why she is on instagram
Chatrapati Tararani Teaser: असामान्य शौर्य दाखवणाऱ्या, रणांगण गाजवणाऱ्या, आक्रमक राजकारणी छत्रपती ताराराणीची पहिली झलक

झीनत अमान यांच्या पोस्टवर चाहते कमेंट करीत आहेत. शिल्पा शेट्टीनं देखील झीनत अमान यांच्या पोस्टवर कमेंट केली, शिल्पा म्हणते, 'आम्ही नेहमी सगळ्या प्राण्यांशी चांगलं वागतो आणि कायम वागत राहू झीनतजी.' सिने-निर्माता तनुजा चंद्रानं लिहिलंय,'इन्स्टाग्रामला चांगल्या उद्दिष्टपूर्ण कामांवर बोलण्यासाठी वापरलं पाहिजे. ज्याचा जगाला जास्त फायदा होईल. पशु कल्याण कामाप्रती तुम्ही जे पाऊल उचलले आहात ते प्रंशसनीय आहे.' अनेक झीनत यांच्या पोस्टवर खूप चांगल्या कमेंट्स केल्या आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com