Zwigato Trailer: कपिल शर्मा दिसणार गंभीर भूमिकेत, डिलेव्हरी बॉयची कथा सांगणार Zwigato, ट्रेलर प्रदर्शित

कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माचा बहुप्रतिक्षित Zwigato चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
Zwigato Trailer Out
Zwigato Trailer OutSaam Tv

Zwigato Trailer Out: कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माचा बहुप्रतिक्षित Zwigato चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. पुरस्कार विजेत्या दिग्दर्शक नंदिता दास यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कपिलने चित्रपटात फूड डिलेव्हरी बॉयची भूमिका साकारली आहे.

चित्रपटात सामाजिक विषयामुळे प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. यामध्ये फूड डिलेव्हरी बॉयचा संघर्ष त्याला होत असणारा त्रास चित्रित करण्यात आला आहे. परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी डिलेव्हरी बॉय नक्की काय काय काम करतो, हे या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे.

Zwigato Trailer Out
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan मधील नव्या गाण्यावर सलमान- पूजाच्या अफलातून 'हूक स्टेप्स', लयभारी टीझर...

'झ्विगाटो' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना फारच भावनिक करतो. ट्रेलरची सुरुवात कपिलने Zwigato ॲपवर काम करण्यापासुन होते. तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना जेवण देण्याचं काम करत असतो, नंतर जादा कमाईसाठी लोकांसोबत सेल्फी क्लिक करतो आणि सर्वोत्तम रेटिंग मिळवण्याचा प्रयत्न करतो.

या चित्रपटात कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका शहाना गोस्वामीने साकारली असून ती एक साधारण गृहिणी दाखवली आहे. या काळात त्याची पत्नी देखील नवीन नोकरी सुरू करते, जी त्याला आवडत नाही. लवकरच, त्याचे रेटिंग कमी होतं आणि त्याचा संघर्ष सुरू करतो. हताश होऊन तो मॅनेजमेंटशी संपर्क साधतो पण त्याला कसलीही मदत मिळत नाही.

Zwigato Trailer Out
Chandramukhi 2: चंद्रमुखी परत येते, कंगनाने शेअर केली चाहत्यांसाठी हटके पोस्ट

अशाप्रकारे ते आपला संसार कशाप्रकारे चालवतात, कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जात संसार करतात हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच कळेल. सोबतच रिअल लाईफमध्ये डिलेव्हरी बॉयला कशाप्रकारे वागणूक मिळते. त्यांना एका ऑर्डरसाठी किती मेहनत करावी लागते, अशा अनेक मुद्द्यांवर चित्रपटाची कथा आधारित आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होऊन अवघे काही तासच उलटले असून हजारोंमध्ये लाईक्स मिळाले आहेत. तर लाखो युजर्सने चित्रपटाचा ट्रेलर पाहिला आहे.

Zwigato Trailer Out
Hemant Dhome: एका गाण्यासाठी घेतला दिग्दर्शकाने हटके निर्णय, हेमंत ढोमेने सांगितला ‘सातारचा सलमान’ चित्रपटाचा किस्सा

देशातील सर्वात लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्माचा नॉन कॉमिक अवतार पाहून तुमचा विश्वास बसणार नाही. यामध्ये त्याने उत्तम अभिनय करण्याचा प्रयत्न केला आहे, आता त्याच्या भूमिकेला प्रेक्षक कशाप्रकारे प्रतिसाद देतात हे येता काळच ठरवेल.

सामान्यांची भूमिका कपिललाच फारच भावलेलली दिसून येत आहे. Zwigato हा चित्रपट टोरोंटो आणि बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देखील प्रदर्शित करण्यात आला आणि त्याला प्रेक्षकांचा चांगला आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट 17 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com