राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल भोसलेंना अटक

सरकारनामा
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी बँकेचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांना आज रात्री अटक करण्यात आली

 

 

पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी बँकेचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांना आज रात्री अटक करण्यात आली.  शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी बँकेचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी नगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे रिझर्व्ह बँकने २०१८-१९चे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बँकेचे ऑडिट केले असता ७१ कोटी ७८ लाख रुपये कमी असल्याचे आढळून आले. त्यामुळे शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये अनिल भोसले यांच्यासह शैलेश भोसले, तानाजी पडवळ, विष्णू जगताप आणि हनुमान सोरते आदी पदाधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या पैकी अनिल भोसले,  कैलास भोसले, तानाजी पडवळ व सूर्याजी जाधव या चौघांना गुन्हे शाखेने रात्री उशिरा अटक केल्याचे,  अशोक मोराले, अतिरिक्त पोलिस आयुक्त ( गुन्हे) यांनी सांगितले.
 

WebTittle ::  Ex NCP MLA Anil Bhosle arrested


संबंधित बातम्या

Saam TV Live