VIDEO | मुख्यमंत्रीसाहेब तुमच्या शिवसैनिकांना आवरा...

VIDEO |  मुख्यमंत्रीसाहेब तुमच्या शिवसैनिकांना आवरा...

ही शिक्षा आहे..मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक पेजवर एक क्षुल्लक कमेंट केल्याची. मुंबईतल्या वडाळा पुर्वेकडच्या शांतीनगरात राहणाऱ्या हिरामणी तिवारींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फेसबुक पेजवर जाऊन कमेंट करणं महागात पडलंय. "जमिया की घटना जालियनवाला बाग की याद दिलाती है" अशी कमेंट त्यांनी उद्धव ठाकरेंच्या फेसबुक पेजवर केली होती. मात्र त्यांच्या या पोस्टमुळे शिवसैनिक संतापले आणि त्यापैकी काहींनी तिवारींना थेट त्यांच्या घरातून बाहेर काढत मारहाण केली. फक्त मारहण करून समाधान झालं नाही, म्हणून मग शिवसैनिकांनी तिवारींचं मुंडणही केलं.

शिवसैनिकांची ही अरेरावी सर्वसामान्यांसाठी तशी नवी नाही. कारण 'शिवसेना स्टाईल आंदोलन' अशा गोंडस नावाखाली यापुर्वीही शिवसैनिकांचा असा धिंगाणा या राज्याने अनेकदा पाहिलाय. आता तर सत्तेची सूत्रही आपल्याच हाती आहेत, या जाणीवेने शिवसैनिकांचे बाहू फुरफूरू लागल्यास आश्चर्य ते काय? पण हा सगळा प्रकार पोलिसांच्या उपस्थितीतच झाल्याचा आरोप तिवारींनी केलाय.  

शिवसैनिकांची अरेरावी पुन्हा एकदा पहायला मिळाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबूक पोस्टवर कमेंट टाकल्याने मुंबईतल्या एका व्यक्तीला शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com