VIDEO |  तुम्हाला तुमची पत्नी पिडते का?

VIDEO | तुम्हाला तुमची पत्नी पिडते का?

अंहकार, चिडचिड, सोशल नेटवर्किंग, अफेअर्स आणि बरचं काही... बायकांच्या या त्रासानं नवरे पुरते बेहाल झालेत... ही काही फक्त नाक्यावरची चर्चा नाही... तर एकट्या नागपुरात 595 पुरुष पोलिसांकडे तक्रार द्यायला आलेत.. 

नागपुरात 2 वर्षांत 595 पुरुषांनी तक्रार केलीए 

2017-18मध्ये 198 तक्रारी होत्या

तर यात वाढ होऊन गेल्या वर्षात 397 तक्रारी दाखल झाल्यात. पोलिसात न जाणाऱ्यांची तर गणतीच सोडा... या नवऱ्यांना नेमका त्रास काय होतोय..हे आम्ही जाणून घेतलयं. बायकोला छळणाऱ्या नवऱ्यावरचे रडके सिनेमे यायचा काळ आता गेला.. वास्तवातही तशी परिस्थिती राहिलेली नाही, हे सांगायला ही आकडेवारी पुरेशी आहे... अत्याचार नवऱ्यावर झाला काय किंवा बायकोवर, दोन्ही वाईटच... पण पुरुषांवरचा अत्याचार कायम टिंगल-टवाळीचा विषय ठरतो, हे त्याहून वाईट आहे.
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com