VIDEO | दाक्षिणात्य पळवतायत मटणाचा घास

VIDEO | दाक्षिणात्य पळवतायत मटणाचा घास

कोल्हापुरात मटणप्रश्न काही सुटत नाहीए... बंद पाळला जातोय... आंदोलन केलं जातंय.. मात्र कोल्हापूरकरांच्या ताटात तांबडा पांढरा काही दिसत नाहीए.... आणि यामागचं कारण आहे, दक्षिण भारतातले खाटिक... जे कंटेनरच्या कंटेनर भरून बकऱ्या चेन्नई आणि बंगळुरूत घेऊन जातायत... 
 राज्यातील आठवडा बाजारांतून दाक्षिणात्य खाटिक मोठ्या प्रमाणावर बकरी खरेदी करतात... जिथे आपल्याकडचे खाटिक केवळ 60 ते 70 बकऱ्या घेऊन जाऊ शकतात... तिथे हे खाटिक आपल्या कंटनेरमधून एकाचवेळी 700 बकऱ्या घेऊन जातात... त्यामुळे इथला धंदा चौपट होऊन.. तिथला धंदा दसपट वाढलाय...

कोल्हापूरच नाही, तर सगळ्या महाराष्ट्रातल्या ताटातलं मटण दाक्षिणात्यांनी पळवून नेलंय.. आणि अद्यापही नेतायत... चेन्न्ई आणि बंगळुरुत 640 रुपये किलोनं मटणाची विक्री करतायत... इथले खाटिक हवालदिल आहेत.. तर खवय्ये दर कमी होण्याची वाट बघतायत.. पण असेच कंटेनरच्या कंटेनर दक्षिण भारतात जात राहिले.. तर इथल्या खवय्यांच्या ताटात मटण पडणं कठीणए... 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com