जाणून घ्या एनडीएच्या विजयाचे 3 M फॅक्टर, बिहारमधे मोदी कसे ठरले गेमचेंजर? वाचा सविस्तर...

जाणून घ्या एनडीएच्या विजयाचे 3 M फॅक्टर, बिहारमधे मोदी कसे ठरले गेमचेंजर? वाचा सविस्तर...

बिहारमध्ये भाजपला मिळालेल्या यशात मोदींचा करिष्मा दिसून आला. मात्र त्यापेक्षाही अधिक परिणामकारक ठरलं ते भाजपने पडद्यामागे केलेलं नियोजन.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने बिहारमध्ये ऐतिहासिक आघाडी घेतलीय. भाजपच्या या कामगिरीसाठी 3 एम फॅक्टर कारणीभूत ठरलेत. 


फॅक्टर क्रमांक 1 - नरेंद्र मोदी
खरं तर सलग 15 वर्ष सत्ता उपभोगलेल्या नितीश कुमारांना अॅन्टी इन्कम्बसीचा फटका बसेल असे अंदाज सर्वांनीच वर्तावले होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या प्रचाराचं नेतृत्व करत सभांचा धडाका लावला. त्यामुळे जेडीयुच्या जागा घटल्या, तरीही भाजपने सरशी साधली.

फॅक्टर क्रमांक 2 - महिला
नितीश कुमार यांना सायलेंट वोटर असलेला महिला मतदारांचा मोठा पाठिंबा आहे. याशिवाय केंद्र सरकारने महिलांसाठी जाहिर केलेल्या उज्वला योजना, मोफत धान्य योजना, आणि पक्की घरे यासारख्या योजनांमुळे बिहारमधला महिला मतदार एनडीएच्या पाठिशी उभा राहिला. 

फॅक्टर क्रमांक 3 - मुस्लिम मतदार
बिहारमध्ये 17 टक्के मुस्लिम मतदार असून आजवर हा एकगठ्ठा मतदार लालूप्रसाद यांच्या राजदच्या पाठिशी होता. पण यंदाच्या निवडणुकीत हा मतदार विविध पक्षांमध्ये विभागला गेल्याने त्याचा फायदा एनडीएला झाला. 

बिहारच्या निकालानंतर भाजप हा बिहारमधला एक मोठा पक्ष म्हणून समोर आलाय. त्यामुळे इथून पुढची भाजपची बिहारमधली पावलं अधिक आक्रमक असतील हे नक्की.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com