VIDEO| काळी पोस्टर्स हद्दपार.. आता मनसेची भगवी पोस्टर्स

VIDEO| काळी पोस्टर्स हद्दपार.. आता मनसेची भगवी पोस्टर्स

काळ्या बॅकग्राऊंडवर भगवी अक्षरं.. आणि सोबत राज ठाकरेंचा फोटो किंवा व्यंगचित्र. सोबत मराठीह्दयसम्राट असा राज ठाकरेंचा उल्लेख. मनसेच्या पोस्टरबाजीची ही स्टाईल ठरलेली असायची. पण 23 जानेवारीला होणाऱ्या अधिवेशनासाठी जी पोस्टर्स मनसेनं लावली आहेत, ती पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. 


मनसेकडून चक्क भगव्या रंगाची पोस्टर्स लावण्यात आलीयेत. या पोस्टर्समधनं मराठीह्रदयसम्राट हा शब्दही गायब झालाय. राज ठाकरेंचा उल्लेख महाराष्ट्र धर्म सम्राट असा करण्यात आलाय. विशेष म्हणजे शिवसेनाभवनासमोरच ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कोणतीही पोस्टर्स एक तर काळ्या रंगात असायची किंवा मनसेच्या झेंड्याच्या रंगात असायची. आता मात्र चक्क भगव्या रंगात मनसेची पोस्टर्स दिसत आहेत. मराठीह्रदयसम्राट असा राज ठाकरेंचा उल्लेख जाऊन धर्मसम्राट असा उल्लेख करण्यात आलाय. मनसेचा झेंडा बदलणार, मनसे हिंदुत्वाकडे झुकणार अशा चर्चांना उधाण आलेलं असतानाच या पोस्टर्समुळे मनसेचं भगवेकरण होणार याचं कवित्व रंगायला सुरुवात झालीय.

WebTittle:: Black posters expel Now MNS saffron posters

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com