लग्नात रक्तदान शिबिर...वधू-वरानेही हळदीच्या अंगाने केले रक्तदान

लग्नात रक्तदान शिबिर...वधू-वरानेही हळदीच्या अंगाने केले रक्तदान
Bride and Groom in Baramati Donated Blood on Wedding Day in Baramati

बारामती : कोरोना महामारीच्या Coroan Pandemic काळात रक्ताचा तुटवडा असल्याने देऊळगावगाडा दौंड तालुक्यातील देऊलगाडा  येथे एका पैलवानाने स्वतःच्या लग्न मंडपात रक्तदान शिबिर Blood Donation Camp ठेवले. नवरदेवाच्या हाकेला तरूणांनी उस्त्फुर्त प्रतिसाद दिला. वधू-वराने हळदीच्या अंगाने रक्तदान करत वेगळा पायंडा पाडला आहे. Bride and Groom in Baramati Donated Blood on Wedding Day in Baramati

लग्नात अक्षता म्हणून फुलांचा वापर करण्यात आला.देऊळगावगाडा येथील मारूती कोकरे यांचा मुलगा अंकुश व कुरबावी ( ता. माळशिरस ) येथील गोरख रूपनवर यांची मुलगी पुनम यांचा शुभविवाह कोकरे यांच्या घरापुढे साध्या पद्धतीने पार पडला. पैलवान व फार्मासिस्ट असलेल्या नवरदेवाने आपला विवाह सामाजिक उपक्रमांनी साजरा व्हावा अशी इच्छा वडीलांपुढे मांडली. वडील मारूती कोकरे यांनी त्यास होकार दिला. पठ्ठ्याने लग्नाचे प्री वेडींगही पारंपरीक वेशभूषेत व आपल्या मेंढरांसमवेत केले.

लग्नाच्या दिवशी मंडपात आहेर मोडणे, हळद खेळणे, जेवणावळी, वाद्यांचा गजर, हार-तुरे, सत्कार- स्वागत समारंभ अशी नुसती रलचेल असते परंतू पैलवानांनी या सर्वांना फाटा दिला. लग्नाची साधी डिजिटल पत्रिकासुद्धा काढली नाही. मंडपात सकाळपासूनच रक्तदान शिबिर चालू होते.

हे देखिल पहा

वर अंकुश व वधू पुनम यांनीही रक्तदान केले.रक्ताचा तुटवडा एेकल्याने रक्तदान शिबिर घेतले. अक्षतांमुळे तांदुळ Rice वाया जातो म्हणून व-हाडींना तांदुळा ऐवजी फुल्यांच्या पाकळ्या दिल्या.  Bride and Groom in Baramati Donated Blood on Wedding Day in Baramati

अंकुश व पुनमच्या लग्नात अक्षता फक्त व्यासपीठावरील व-हाडींनाच देण्यात आल्या. इतर व-हाडींना फुलांच्या पाकळ्या देण्यात आल्या. यातून बचत झालेला तांदुळ सुपे ( ता.बारामती ) Baramati येथील प्राजक्ता गतिमंद मुलांच्या निवासी शाळेला व गलांडवाडी ( ता.दौंड )  येथील खाडे बालकाश्रमाला देण्यात आला. आंब्याच्या रोपांचे रोपण करून व-हाडी मंडळींना रोपे देण्यात आली. या उपक्रमामुळे कोकरे व रूपनवर कुटुंबियांचे कौतुक होत आहे.
Editd By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com