VIDEO| कार फक्त पळणार नाही तर बोलणार सुद्धा

VIDEO| कार फक्त पळणार नाही तर बोलणार सुद्धा


हीच आहे ती कार... जी चक्क बोलते... टेस्ला मॉडेल थ्री... विश्वास बसत नसेल... तर हा व्हिडीओ बघा... लाल रंगाची ही गाडी निघाली... आणि गाडीनं म्हटलं.... "नुसतं उभं राहून पाहताय काय...चला फेरफटका मारु..." गाडी इंग्रजीत बोलतेय.. जरा नीट ऐका... 

 टेस्लाचे सीईओ ऍलन मस्क यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय...ऍलन यांना आपल्या गाडीचं भलतंच कौतुक आहे.... त्यांनी हॅकर्सना ही गाडी हॅक करण्याचं चॅलेंज देऊन टाकलंय... इतकंच नाही त्यासाठी 7 कोटी आणि कार सुद्धा देऊ केलीए.... 

आता एखादा हॅकर हॅक करायला आलाच, तर ही गाडी काय बरं म्हणेल... गाडी इंग्रजाळलेली आहे.. तेव्हा डोन्ट टच मी वगैरे म्हणेल... हिंदी येत असतं.. तर बॉलिवूडमधल्या नट्यांसारखी बचाव बचाव ओरडलीही असती.... 

आता ही बोलणारी कार हॅक होते की नाही, ते हॅकर्स स्पर्धेत कळेलच.. पण उद्या रस्त्यात एखादी गाडी तुमच्याशी काही बोलली.. तर आश्चर्य वाटून घेऊ नका... कारण या कारची पहिली झलक साम टीव्हीने तुम्हाला दाखवली आहेच.. 

WebTittle:: The car will not only run away but also speak


 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com