ख्रिस गेलचा 'पंजाबी डॅडी' लूक होतोय व्हायरल

ख्रिस गेलचा 'पंजाबी डॅडी' लूक होतोय व्हायरल
gayle.

ख्रिस गेल (Chris Gayle) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खरं तर, या वेळी गेल हा ‘पंजाबी डॅडी लूक’ मुळे चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. गेलने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर (Instagram) एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तो पगडी घालताना दिसत आहे. गेलने हा फोटो शेअर करत लिहिले आहे की, 'मी उद्याच्या शूटसाठी वाट नाही पाहू शकत कारण मी पंजाबी डॅडी होणार आहे'. गेलची ही स्टाईल पाहून चाहतेही खूप खूश झाले आहेत. अगोदरही गेलने खेळण्यातल्या कारचे छायाचित्र शेअर केले होते. तेव्हा तो सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत आला होता. यावर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नरने (David Warner) प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

'युनिव्हर्स बॉस' (Universe Boss) म्हणून ओळखल्या जाणार्‍या गेलला आपल्या फलंदाजीच्या शैलीसाठीही ओळखले जाते. गेल सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतो आणि तो नेहमी नवीन काहीतरी करून चाहत्यांना खुश करत असतो. एबी डिव्हिलियर्स ज्या प्रकारे भारतात लोकप्रिय आहे, गेल देखील भारतीय चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. आयपीएल पुढे ढकलल्यानंतर गेल पुन्हा एकदा वेस्ट इंडिजच्या राष्ट्रीय संघाकडून खेळताना दिसणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत गेल वेस्ट इंडीजकडून खेळेल, तर वॉर्नरदेखील वेस्ट इंडिजच्या दौर्‍यावर असेल. ऑस्ट्रेलियाचा संघ वेस्ट इंडीज दौर्‍यावर 3 एकदिवसीय सामने आणि 5 टी -20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.((Chris Gayle's 'Punjabi Daddy' Look Goes Viral))

टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी गेल आपल्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. आयपीएलच्या या हंगामात गेल आणि वॉर्नर दोघेही काही खास कामगिरी करू शकले नाहीत. गेलने या हंगामात 8 सामने खेळताना एकूण 178 धावा केल्या, तर वॉर्नरने हैदराबादकडून या मोसमात 6 सामने खेळून 193 धावा केल्या. या हंगामात वॉर्नरने हैदराबादचे कर्णधारपदही गमावले होते.
Edited By : Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com