CORONA UPDATE | वाचा कोरोनाशी संबंधित TOP 10 बातम्या
corona 456

CORONA UPDATE | वाचा कोरोनाशी संबंधित TOP 10 बातम्या

मुंबई - कोरोनाचं थैमान महाराष्ट्रात सुरु आहे. घडामोडी वेगानं घडत आहे. कुठे काय कोरोनाबाबतच्या काय काय नव्या बातम्या समोर आल्या आहेत, त्याचा धावता आढावा घेऊयात. 

कोरोनाच्या TOP 10 घडामोडी

  • 01) कोरोना व्हायरसचा भारतीय सेनेलाही फटका, लडाखमध्ये सापडला कोरोना पॉझिटिव्हि जवान, आतापर्यंत देशात 147 जणांना कोरोना, तर तिघांचा दुर्दैवी मृत्यू
  • 02) पुण्यात आणखी एक कोरोनाग्रस्त आला समोर, राज्यातील कोरोनो पेशंट्सची संख्या 42वर
  • 03) पुणे जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली 18 वर, प्रशासनाकडून गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न, PMPMLच्या  583 फेऱ्या बंद
  • 04) मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर मुंबई लोकलमधील गर्दीत लक्षणीय घट, बेस्ट बस स्थानकंही ओस, प्रवासी संख्या घटली
  • 05) कोरोनाच्या धास्तीनं पुण्यातील रस्त्यांवर शुकशुकाट, जवळपास सर्वच दुकानं आणि कार्यालयं बंद, कोरोनामुळे पुण्याला ब्रेक
  • 06) राज्यातल्या सरकारी कार्यालयांना सुट्टी नाही, मुख्यमंत्र्याचं स्पष्टीकरण, खासगी कंपन्यांना मात्र वर्क फ्रॉम होमच्या सूचना
  • 07) कोरोना व्हायरसचा फटका कांदा दराला कांद्याच्या दरात सरासरी 400 रुपयांची घसरण
  • 08) कोरोनाचा फटका सोन्याच्या दरांना, पन्नास हजाराच्या आसपास पोहोचलेला सोन्याचा दर 40 हजार 200 रुपयांपर्यंत खाली उतरला, ग्राहकांना सोनेखरेदीची सुवर्णसंधी
  • 09) अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये जहाजावर अडकले १३१ भारतीय कर्मचारी, मायदेशात परत आणण्यासाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाकडे घातली साद 
  • 10) महाराष्ट्रातून सहलीसाठी गेलेले 38 डॉक्टर उझबेकिस्तानच्या  विमानतळावर अडकले, व्हिडिओ तयार करून भारतीय सरकारकडे मदतीची मागणी

पाहा व्हिडीओ - 

MUMBAI MAHARASHTRA CORONA VIRUS INTERNATIONAL HEALTH ARMY GOLD SHARE MARKET COVID-19 HEALTH DEAD PEOPLE 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com