कोरोना लशीचा डोस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण, लशीवर प्रश्नचिन्ह...

कोरोना लशीचा डोस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण, लशीवर प्रश्नचिन्ह...

कोरोनाची लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आरोग्यमंत्र्यांनाच कोरोनाची लागण झालीय. लस घेऊनही कोरोना झाल्याने लसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. कोणती आहे ही लस? आणि कोणच्या स्वयंसेवकाला झालाय कोरोना वाचा सविस्कर...

कोरोनाची लस घेतल्यानंतरही हरियाणाच्या आरोग्यमंत्र्यांनाच कोरोनाची लागण झाली आणि एकच खळबळ उडाली. 'कोवॅक्सीन'चा लस घेऊनही कोरोना झाल्यानं लशीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अनिल विज यांनी 'कोवॅक्सीन' कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत स्वयंसेवक म्हणून लस टोचून घेतली होती. पण, लस घेतल्यानंतरही हरियाणाचे आरोग्य आणि गृहमंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण झालीय. विज यांनी ट्विटरच्या माध्यामातून याबाबतची माहिती दिलीय. तसेच आपल्या संपर्कात आलेल्यांनाही तातडीने कोविडची चाचणी करण्याचं आवाहन विज यांनी केलंय. विज यांच्यावर सध्या अंबालाच्या सिव्हील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं विज यांनी सांगितलं.
 

लस कधी घेतली आणि कोरोना कधी झाला पाहा...

  1. हरियाणामध्ये 20 नोव्हेंबर रोजी 'कोवॅक्सीन' या कोरोनावरील लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली
  2. अनिल विज यांनी स्वत:हून पुढे येत चाचणीसाठी तयारी दर्शविली
  3. 20 नोव्हेंबर रोजी विज यांनी कोवॅक्सीनचा पहिला डोस घेतला
  4. विज यांच्यासोबत 200 जणांना कोवॅक्सीनचा डोस देण्यात आला
  5. दुसरा डोस 28 दिवसांनंतर देण्यापूर्वीच अनिल विज यांना कोरोना झाला

आयसीएमआरच्या संयुक्त विद्यमाने भारत बायोटेक कंपनीकडून कोरोनावर मात करणाऱ्या 'कोवॅक्सीन' या लशीची निर्मिती केली जातेय. पण, हरियाणाच्या आरोग्यमंत्र्यांनाच लस घेऊनही कोरोना झाल्यानं लशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com