चांडोली ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची विदारक अवस्था: डॉक्टरांनीच मांडली व्यथा...

चांडोली ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची विदारक अवस्था: डॉक्टरांनीच मांडली व्यथा...
Patients plight in Chandoli Rural Hospital in Pune District

चांडोली: खेड Khed तालुक्यात कोरोना Corona महामारीचे भिषण संकटाचे विदारक वास्तक चांडोली Chandoli ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनीच समोर आणले आहे. उपचारादरम्यान रुग्णांना अनेक यातना सहन कराव्या लागत असुन तीन दिवसापासुन एक रुग्णाचे डायपर बदलले नसल्याचे वास्तव डॉक्टरांनीच समोर आणत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.  The critical condition of the patients at Chandoli Rural Hospital

चांडोली ग्रामीण रुग्णालयाचे Rural Hospital वैद्यकीय अधिकारी डॉ प्रविण इंगळे यांनी रुग्णालयांची परिस्थिती दाखवणारा व्हिडीओ काढत तेथील भीषण परिस्थिती दाखवून दिली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या रुग्णालयात  45 ऑक्सिजन बेड Oxygen Beds उपलब्ध आहेत. परंतु 45 बेड्स वर 46 रूग्णांवर उपचार सुरु आहेत.

46 रुग्णांपैकी काल सकाळीच  एका रुग्णाचा मृत्यु झाला. कोरोना मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या बॉडी ची विल्हेवाट लावणे हि नगरपालिकेची जबाबदारी आहे.  मात्र मेल्यानंतरही रुग्णांना यातना सहन कराव्या लागत आहेत.  मात्र वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही प्रशासनातील प्रांताधिकारी, तहसिलदार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि चांडोली ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक आपली जबाबदारी टाळत आहेत. असा गंभीर आरोप डॉ प्रविण इंगळे यांनी केला आहे. 

तसेच रुग्णालयात अजून 4 रुग्ण एकदम गंभीर अवस्थेत आहेत असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांच्याकडे ऑक्सिजन आणि रेमिडिसिवीर Remedicivir  इंजेक्शन चा साठा देखील अल्प प्रमाणातच राहिलेला आहे अशी हळहळ त्यांनी व्यक्त केली. सोबत कामासाठी मनुष्यबळ तर नाहीच असेही त्यांनी सांगितले आहे. The critical condition of the patients at Chandoli Rural Hospital

कोरोना महामारीच्या संकट काळात राज्य सरकार State Government मृत्युदर कमी करण्यासाठी प्रयत्नशिल आहेत,  तर दुसरीकडे रुग्नालयातील हे विदारक चित्र असेल तर मृत्युदर कसा रोखणार असा प्रश्न डॉक्टरांनीच उपस्थीत केला आहे. आणि डॉक्टर आणि मनुष्यबळ Manpower वाढवून द्या अशी मागणी प्रवीण इंगळे यांनी सरकारकडे केली आहे.

Edited By- Sanika Gade 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com