VIDEO | फास्टॅग टोल यंत्रणेवर सायबर हल्ले

VIDEO | फास्टॅग टोल यंत्रणेवर सायबर हल्ले

टोलवसुलीवेळी होणारी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा दूर व्हाव्यात, म्हणून केंद्र सरकारनं फास्टॅग यंत्रणा आणली. पण आता या फास्टॅग यंत्रणेवरच टोल हल्ले सुरु झालेत. वाहनधारकांच्या खात्यातील रक्कम लंपास करायला हॅकर्सनी सुरुवात केलीय. 

एखाद्या वाहनधारकाने फास्टॅग यंत्रणा कार्यान्वित केली की, त्याला एखाद्या अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन किंवा मेसेज येतो, तुमचा मोबाईल नंबर आणि वाहन नंबर फास्टॅग यंत्रणेशी जोडण्यासाठी सोबत देत असलेल्या लिंकवर क्‍लिक करायला सांगितलं जातं. फास्टॅग यंत्रणा ही बहुतेक वाहनधारकांसाठी नवीनच असल्यामुळे त्याच्याकडून दिलेल्या लिंकवर क्‍लिक केले जाते. क्‍लिक केल्याबरोबर संबंधित वाहनधारकाच्या बँक खात्याबद्दलची सर्व गोपनीय माहिती संबंधित हॅकर्सच्या ताब्यात जाते आणि त्याच्या आधारे त्या वाहनधारकाच्या खात्यावरील हवी तेवढी रक्‍कम हव्या त्या खात्यावर ट्रान्सफर होते.

सायबरतज्ज्ञदेशात अस्तित्वात असलेल्या सहा कोटी वाहनधारकांपैकी जेमतेम 8 ते 10 टक्के वाहनधारकांकडे सध्या फास्टॅग टोल यंत्रणा कार्यान्वित आहे. मात्र ही यंत्रणा थेट बँक खात्यासी संबंधित असल्यानं या यंत्रणेला हॅकर्सकडून टार्गेट केलं जातंय. वाहनधारकांच्या अज्ञानाचा आणि नवखेपणाचा फायदा घेऊन फास्टॅगच्या माध्यमातून गंडा घालण्यासाठी हॅकर्स सरसावलेत. त्यांना रोखण्याचं मोठं आव्हान आता यंत्रणांसमोर आहे. 

Webtittle :: Cyber ​​attacks on fastag toll systems

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com