हरणटोळ सापांच्या विष्ठेवर प्रतिजैविकांना प्रतिरोधक असणाऱ्या जिवाणूंचा शोध

हरणटोळ सापांच्या विष्ठेवर प्रतिजैविकांना प्रतिरोधक असणाऱ्या जिवाणूंचा शोध
snake

जुन्नर : सह्याद्रीच्या Sahyadri पश्चिम घाटात आढळणाऱ्या हरणटोळ सापांच्या Green Vine Snake विष्ठेवर Ordure अनेक प्रतिजैविकांना प्रतिरोधक असणाऱ्या दोन नव्या जातींच्या जिवाणूंचा Bacteria शोध लागला आहे. Detection Of Bacteria Resistant To Antibiotics On Snake Ordure

जुन्नर Junnar, पुणे Pune आणि चंदीगड Chandigarh येथील 4 शास्त्रज्ञांच्या Scientist पथकाने हे काम केलं आहे आणि हे संशोधन Research नुकतंच आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये देखील प्रसिद्ध झाले आहे. 

हे देखील पहा -

नॅशनल सेंटर फॉर मायक्रोबियल रिसोर्स, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे, मायक्रोबायल टाइप कल्चर कलेक्शन आणि सी.एस.आय.आर.इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रोबियल टेक्नॉलॉजी,चंदीगड या विविध नामांकित संस्थांकडून सापांच्या विष्टेवर संशोधन झाले आहे. Detection Of Bacteria Resistant To Antibiotics On Snake Ordure

त्या संशोधनात श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर येथील जीवशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.रवींद्र चौधरी,पुण्यातील डॉ.योगेश सौचे, डॉ.श्रीकांत पवार,डॉ.प्रमोद माने काम करत होते.

हरणटोळ सापांच्या विष्टेमधील जीवाणूंची ओळख पटविण्यासाठीचे संशोधन कार्य नुकतंच पूर्ण झालं आहे. विशेष म्हणजे संशोधनामध्ये नवीन जीवाणू हे सापाच्या विष्ठेमधूनच शोधून काढण्यात आलेले आहे. मानवांसह सर्व सजीवांमध्ये यजमानाशी संबंधित प्रजातींच्या जीवनाची आरोग्यामध्ये खूप महत्वाची भूमिका असते. Detection Of Bacteria Resistant To Antibiotics On Snake Ordure

मानवावर आणि काही सामान्य जीवांवर बरेच अभ्यास केले गेले आहेत. परंतु आजपर्यत वन्य प्राणी आणि सरपटणारे प्राणी यांच्याबद्दल फारच कमी अभ्यास झालेला आहे. सापांशी संबंधित सूक्ष्मजंतूंचा शोध घेण्याचा हा एक अनोखा अभ्यास होता.या अभ्यासाचा पुढील काळात मोठा फायदा होणार आहे.

प्राण्यांच्या विष्ठेमध्ये असलेले जीवाणू पावसाळ्यात पाण्यामार्फत आणि हवेच्या माध्यमातून मानवाच्या आणि इतर प्राण्यांच्या संपर्कात येतात. नवीन शोधून काढलेले हे जीवाणू प्लॅनोकोकेसी कुटुंबातील आहेत. यातील काही प्रजाती रोगकारक आहेत. हे संशोधन स्प्रिंजर - नेचर जर्नल अँटनी व्हॅन लीऊवेनहोक मध्ये प्रकाशित झाले आहे. Detection Of Bacteria Resistant To Antibiotics On Snake Ordure

सापांमधील जीवाणू ओळखणे महत्वाचे आहे कारण ते अनेक रोगांस कारणीभूत ठरतात. अनेक लोक या जिवाणूंच्या संपर्कात येऊ शकतात. सापामध्ये सापडलेल्या बहुतेक जीवाणूंच्या प्रजातीचे सार्वजनिक आरोग्यास महत्त्व आहे.

तसेच जगभरात संसर्ग होऊन गंभीर आजार उद्भवलेले आहेत तर काही सापांमध्ये अपायकारक जीवाणू असू शकतात. भविष्यात वन्यजीवपासून होणारे रोग टाळण्यासाठी अशा अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे फार महत्वाचे आहे. Detection Of Bacteria Resistant To Antibiotics On Snake Ordure

ज्यामुळे भविष्यात विविध मानवी रोग किंवा पुढील साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखणे व भविष्यातील अभ्यासात सापाच्या आतड्यातील या सूक्ष्मजीवाच्या भूमिकेचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

Edited By : Krushnaarv Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com