VIDEO | शिक्षकांसाठीच्या पात्रता परीक्षेवरुन पुन्हा वाद

VIDEO | शिक्षकांसाठीच्या पात्रता परीक्षेवरुन पुन्हा वाद

राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा होतेय, 3 लाखांहून अधिक शिक्षक या परीक्षेला सामोरं जातायंत. पण या परीक्षेवरनं सवाल उपस्थित केले जात आहेत. कारण 2018 मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत पात्र ठरलेल्या शिक्षकांना अजूनही नोकरी मिळालेली नाही. त्यातच आता पुन्हा ही टीईटी होतेय. त्यामुळे परीक्षार्थींमधून नाराजी व्यक्त केली जातेय. 

टीईटी दर 2 वर्षांनी घेतली जाते. यापूर्वी 15 जुलै 2018 रोजी ही परीक्षा झाली होती. पण या टीईटीमध्ये पात्र ठरलेल्या अनेक शिक्षकांना आजपर्यंत शिक्षक म्हणून नोकरीच मिळाली नाही. पात्र असतानाही शाळांमध्ये जागाच भरल्या गेल्या नाहीत. त्यामुळे अनेक शिक्षकांवर बेरोजगारीची वेळ आली. त्यामुळे किमान यावेळी तरी राज्य सरकार या परीक्षेत पात्र शिक्षकांना नोकरी देणार का? असाही प्रश्न शिक्षकांकडून विचारला जात आहे.


 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com