धक्कादायक - ४४ दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण; वैदयकीय क्षेत्रात खळबळ

धक्कादायक - ४४ दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण; वैदयकीय क्षेत्रात खळबळ
Baby Infant

बुलडाणा :  ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रभाव बघता आता सतर्क होण्याची वेळ आली आहे. बुलडाणा Buldana जिल्ह्यातील मलकापूर Malkapur तालुक्यातील उमाळी गावात एका ४ दिवसांच्या बाळाला Baby Infant कोरोनाची लागण झाल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. Forty Four Days Infant Affected By Corona in Buldana

बुलडाणा जिल्ह्यात पहिल्यांदाच इतक्या म्हणजे फक्त दीड महिन्याच्या बाळाला कोरोनाची Corona लागण होण्याची पहिलीच घटना समोर आली आहे. त्यामुळे सर्वसामन्यासह वैद्यकीय क्षेत्रात हा चिंतेचा विषय बनला आहे.

हे देखिल पहा - 

बुलडाणा जिल्ह्यातील उमाळी गावातील या ४४ दिवसांच्या बाळाला दोन दिवसांपासून सर्दीताप येत असल्याने आधी गावातील डॉक्टरांकडे तात्पुरते उपचार केल्यावर बाळाला खामगाव येथील एका खाजगी बालरोग तज्ञाकडे Padiatirc Doctor तपासणीसाठी आणण्यात आले. बाळाची व बाळाच्या आईची कोविड तपासणी करण्यात आली असता बाळाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला; तर आईचा निगेटिव्ह अहवाल आला. बाळाला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यावर तात्काळ बाळाला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात नेण्यात आले.

पण या रुग्णालयात इतक्या लहान कोरोना बधितावर उपचार करण्याची सोय नसल्याने बाळाला अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले. Forty Four Days Infant Affected By Corona in Buldana

दररोज कोरोना व्हायरस चे नवीन नवीन स्ट्रेन येत असताना आता तर लहान मुलांमध्ये कोरोनाची लागण वाढल्याचं दिसून येत आहे आणि आता तर ४४ दिवसांच्या शिशु मध्ये कोरोनाने शिरकाव केल्याने सर्व सामान्यांसह वैदयकीय क्षेत्रातही चिंतेचा सूर बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे या लहानग्या बाळाची आई निगेटीव्ह आहे. त्यामुळे बाळाला कोरोनाची बाधा कुठून आणि कशी झाली असेल हा संशोधनाचा विषय आहे.
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com