आईच्या आठवणीने आरोग्यमंत्री टोपे हुंदके देऊन ढसा-ढसा रडले !
Rajesh Tope

आईच्या आठवणीने आरोग्यमंत्री टोपे हुंदके देऊन ढसा-ढसा रडले !

मुंबई : उद्या मदर्स डे Mothers Day आहे. यानिमित्ताने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनी आईच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. आईच्या आठवणी Memories सांगत असताना  मात्र ते अत्यंत भावूक Emotional झाले मात्र अश्रूंना आवर घालत त्यांनी आईच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. Health minister Rajesh Tope gets emotional for mother

हे देखील पहा -

आरोग्यमंत्री टोपे यांनी बालपणाबद्दल Childhood व आईबद्दल माहिती सांगताना म्हटले कि, माझ्या बालपणी आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीत राहत असल्याने आईला खूप घरकाम करावं लागायचं. त्यावेळी आपण लहान असल्याने घरकाम पूर्ण करण्यासाठी आई मला दोरीने बांधून ठेवायची अशी एक आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.

माझी आई हीच माझी आद्यगुरू असून कोविडच्या Covid काळात लढण्याची प्रेरणा आईच्या पायाला हात लावल्यानंतर मिळाली असं सांगायला देखील ते विसरले नाहीत. माझी आई आजारी असताना , कोरोना संकटाच्या या कठीण काळात रोज एकदा तरी तिच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद Blessings घ्यायचो असंही ते म्हणाले. या आठवणीत त्यांनी आईबद्दल कृतज्ञता देखील व्यक्त केली. Health minister Rajesh Tope gets emotional for mother

Edited By - Krushna Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com