वीजबिलातून सूट मिळण्याची शक्यता मावळली, जनतेला पुन्हा विजेचा शॉक

वीजबिलातून सूट मिळण्याची शक्यता मावळली, जनतेला पुन्हा विजेचा शॉक

लॉकडाऊनच्या काळात वापरलेल्या वीजेच्या अव्वाच्या सव्वा बिलांनी हैराण झालेल्या ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता मावळलीय. कारण राज्याच्या तिजोरीत ख़डखडाट असल्याने वीज बिल सवलतीचा प्रस्ताव बारगळलाय.

लॉकडाऊनच्या काळातील भरमसाट वीजबिलातून नागरिकांना दिलासा देण्याची राज्य सरकारची घोषणा हवेतच विरलीय. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तब्बल 1800 कोटींची गरज आहे. पण सध्या राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने या योजनेसाठी निधी देण्यास वित्त विभागाने नकार दिलाय.

असा मिळणार होता दिलासा
उर्जा विभागाने तयार केलेल्या प्रस्तावानुसार 100 युनिटपर्यंतच्या वीज वापरणाऱ्या ग्राहकांचं वीजबिल माफ केलं जाणार होतं. तर 101 ते 300 युनिटपर्यंतचा वीज वापर असणाऱ्या ग्राहकांना वीजबिलात 50 टक्के सूट दिली जाणार होती. 301 युनिटपेक्षा अधिक वीज वापरणाऱ्या ग्राहकांना 25 टक्के सूट दिली जाणार होती. याशिवाय एप्रिलपासून लागू झालेल्या नवीन वीजदर आकारणीला स्थगिती देण्याची शिफारसही या प्रस्तावात करण्यात आली होती. 

सध्या हा प्रस्ताव थंड बस्त्यात गेला असून पुढच्या काळातही वीजग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता नाहीए..त्यामुळे वाढीव वीज बिलं भरण्याची तयारी ग्राहकांनी ठेवलेली बरी.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com