आमदार संतोष बांगर यांनी कोरोना रुग्णांसाठी दिले 90 लाख
Hingoli Shivsena MLA Santosh Bangar

आमदार संतोष बांगर यांनी कोरोना रुग्णांसाठी दिले 90 लाख

हिंगोली : संपूर्ण देशासह जगात कोरोना Corona महामारी ने ग्रासले आहे, लाखोंच्या संखेने बाधित रुग्ण आढळत आहेत, तर हजारोंच्या संख्येने रुग्णांचा मृत्यू होत आहे. या संकटात प्रत्येकजण आपल्या परीने मदत करत आहे. मात्र हिंगोली Hingoli जिल्ह्यातील नागरिकांना वेळेत उपचार व इंजेक्शन मिळावे म्हणून शिवसेना Shivsena आमदार संतोष बांगर Santosh Bangarयांनी स्वतःच्या खात्यात जमा करून ठेवलेली नव्वद लाख रुपयांची मुदत ठेव रक्कम देत रुग्णांना आवश्यक असलेली औषधे उपलब्ध करून दिली आहेत. Hingoli Shivsena MLA Santosh Bangar Gave Ninty Lacks for Corona Patients Medicine

2019 च्या विधानसभा निवडणुकीत दिग्गज उमेदवारांना पराभूत करून संतोष बांगर हे महाराष्ट्राच्या Maharashtra विधानसभेत पोहोचले. लहानपणापासून बाळासाहेबांच्या भाषणाने प्रभावित झालेले आमदार संतोष बांगर गेल्या 12 वर्षांपेक्षा जास्त काळ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून काम करत आहेत. अनेकांना अडचणीच्या काळात बांगर यांनी मदत केली. मतदारसंघातील विविध प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेत पोटतिडकीने मांडले , गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या महाभयानक संकटात सापडलेल्या जनतेला सर्वतोपरी मदत करण्यासाठी आमदार बांगर हे पायाला भिंगरी लावून फिरत आहेत.

मात्र जिल्ह्यात सातत्याने वाढणारी कोरोना ची लक्षणीय  संख्या आणि आरोग्य विभागावर येणार ताण प्रचंड आहे. त्यात जिल्ह्यात ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर व रेमडिसिवीर Remdisivir इंजेक्शन  वेळेवर मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. एवढी गंभीर परिस्थिती असताना देखील लोकप्रतिनिधी म्हणून आपण कोणत्याही परिस्थितीत मागे हटणे योग्य होणार नसल्याचे सांगत आमदार संतोष बांगर यांनी थेट मातोश्रीचे दार ठोठावत जिल्ह्याला रेमडिसिवीर इंजेक्शन व पुरेसा ऑक्सिजन साठा मिळण्यासाठी पाठपुरावा केला. अखेर 10000 इंजेक्शन देण्याची तयारी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकारी व उत्पादक कंपनीकडून दाखविण्यात आली. त्यासाठी तब्बल 1 कोटी 40 लाख रुपयांची अग्रीम रक्कम कंपनीकडून मागण्यात आली. Hingoli Shivsena MLA Santosh Bangar Gave Ninty Lacks for Corona Patients Medicine

मात्र अत्यंत मागासलेला असलेल्या हिंगोली जिल्ह्यात कोणत्याही औषध विक्रेत्यांकडे एवढ्या प्रमाणात रक्कम उपलब्ध नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला,. औषध विक्रेते व जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत देखील यावर तोडगा न निघाल्याने अखेर आमदार संतोष बांगर मदतीला धावले , आणि आणि त्यांनी  शहरातील औषधी विक्रेते मनोज आखरे यांना मुदत ठेव असलेल्या बँकेतील तब्बल नव्वद लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला

यानंतर तातडीने इंजेक्शन सैन्य उत्पादक कंपनीला तातडीने पैसे ट्रान्सफर करण्यात आले, आणि लगेच हिंगोली जिल्ह्याला 10000 इंजेक्शन ची ऑर्डर देखील मान्य करण्यात आली, त्यातील पहिला टप्पा म्हणून हिंगोलीत तातडीने एक हजार इंजेक्शन देखीलपाठविण्यात आले. या रुग्णालयात तासन तास थांबून देखील इंजेक्शन मिळत नव्हते, त्या रुग्णालयात देखील काही प्रमाणात इंजेक्शनचे डोस मिळाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. Hingoli Shivsena MLA Santosh Bangar Gave Ninty Lacks for Corona Patients Medicine

जे रुग्णांचे नातेवाईक गेल्या तीन दिवसांपासून इंजेक्शन मिळण्याची वाट पाहत होते त्यांना अखेर इंजेक्शन मिळाले व रुग्णांचे प्राण वाचले नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला.  आमदार बांगर यांच्या कार्याने या सर्व रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू वाहत होते यावर आमदार संतोष बांगर यांनी बोलताना आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत बाळासाहेबांचा वारसा पुढे घेऊन जातोय ,असे सांगत जनतेला निवडणुकीत दिलेलं वचन पूर्ण करत असल्याचे सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com