ICC: एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत बुमराहची घसरण; जाणून घ्या सविस्तर क्रमवारी  
jasprit bumrah.

ICC: एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत बुमराहची घसरण; जाणून घ्या सविस्तर क्रमवारी  

आयसीसीने गोलंदाजांची नुकतीच क्रमवारी (ICC Ranking) जाहीर केली आहे. त्यानुसार बांगलादेशचा (Bangladesh) फिरकीपटू मेहंदी हसनने बढत प्राप्त केली आहे. मेहंदी हसनने (Mehidy Hasan) आयसीसीच्या गोलंदाजी क्रमवारीत अव्वल दोनमध्ये स्थान मिळवले आहे. मेहेंदी पहिल्या दोनमध्ये स्थान मिळवणारा बांगलादेशचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. श्रीलंकाविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात हसनने चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळेच मेहेंदी क्रमवारीत वरती गेला आहे. ताज्या क्रमवारीनुसार हसनने तीन स्थानांची बढत मिळवत दुसर्‍या क्रमांकावर आला आहे. श्रीलंकेविरूद्ध पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये हसनने एकूण 7 बळी घेतले. त्याचबरोबर, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे.(ICC: Bumrah's drop in ODI bowling rankings)

त्याशिवाय बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने आठ पॉईंट्सची कमाई केली असून पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले आहे. रेहमान आता क्रमवारीत नवव्या स्थानावर आला आहे. आयसीसीच्या ताज्या गोलंदाजी क्रमवारीत अव्वल दहामध्ये भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचाही (Jasprit Bumrah) समावेश आहे. त्याच्या क्रमवारीत एक स्थानाची घसरण झाली आहे. जसप्रीत बुमराह आता क्रमवारीत 5 व्या क्रमांकावर आला असून त्याचे 690 पॉईंट्स आहेत. त्याचबरोबर पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या ट्रेंट बोल्टचे 737 पॉईंट्स आहेत, तर दुसर्‍या क्रमांकावर आलेल्या हसनचे 725 पॉंईटस आहेत.

हे देखील पाहा

या क्रमवारीत अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान एक स्थान गमावून तिसर्‍या क्रमांकावर आला आहे. न्यूझीलंडचा मॅट हेन्रीने देखील एक स्थान गमावले  असून तो चौथ्या स्थानावर घसरला आहे. दहा एकदिवसीय गोलंदाजांविषयी बोलताना दक्षिण आफ्रिकेचा कॅगिसो रबाडा सहाव्या क्रमांकावर आहे तर इंग्लंडचा क्रिस वोक्स सातव्या क्रमांकावर आहे.  तसेच, ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवूड आठव्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दहाव्या क्रमांकावर घसरला आहे.

Edited By : Pravin Dhamale
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com